Union Agriculture Minister : केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेय..

Union Agriculture Minister : राज्यात आणि देशात अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असताना, कोरडवाहू भागातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले असताना आणि शेतमालाचे बाजारभाव घसरलेले असताना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मात्र मागील दहा वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होत आहे याबद्दल आत्मविश्वासपूर्वक सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत असून जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट […]
Irrigation project : राज्यातील ‘या’ सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला मंजुरी; हजारो शेतकऱ्यांना दिलासा..

Irrigation project : वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प – बोर (ता. सेलू) आणि धाम (ता. आर्वी) – यांच्या दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित, कार्यक्षम आणि वाजवी पाण्याचा पुरवठा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. वर्षानुवर्षे वापरामुळे आणि हवामानातील बदलांमुळे या दोन्ही प्रकल्पांच्या […]
Soybean price : ऐन सणासुदीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह तेलबियांचे भाव घसरणार?

Soybean price : केंद्र सरकारने अन्न तेल महाग होऊ नये यासाठी मोठा निर्णय घेतला असून, सोयाबीन, सूर्यफूल आणि त्यापासून बनणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील शुल्कात कपात केली आहे. या निर्णयामुळे भारतात तेलाच्या किंमती कमी राहतील, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसेल. कारण, निर्यात कर कमी झाल्यामुळे या तेलबियांची देशांतर्गत मागणी आणि किंमत […]
E-NAM Scheme : शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला राष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग खुला; ई-नाम योजनेसाठी कायद्यात बदल…

E-NAM Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ई-नाम’ (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात […]
Kanda bajarbhav : कांदा बाजारभावाची चांगली बातमी; बांग्लादेशात भारतीय कांद्याला मोठी मागणी..

KAnda bajarbhav : मागील काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे बाजारभाव घटले असून आता सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव झाले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी एक बातमी बांग्लादेशातून समजत आहे. सध्या बांगलादेशात कांद्याचे दर गगनाला भिडले असून, तेथे भारतीय कांद्याची मोठी मागणी निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा […]