Ethanol Pumps : देशभरात ३०० इथेनॉल पंप सुरू होणार , केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती.

केंद्र सरकारची अधिकृत कंपनी असलेल्या इंडियन ऑइल ने देशभर 300 इथेनॉल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली . आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच साखर उद्योगातील विविध मान्यवर होते.  भारतीय शेती व्यवस्थेत ऊस हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे . मात्र आता केवळ साखर उत्पादन वाढवून चालणार नाही उपपदार्थ कडे वळावे लागेल.

भविष्याचा वेध घेत साखर उद्योगाला वाटचाल करावे लागेल.  त्यासाठी आपल्याला आधी समस्या समजावून घ्यावी लागेल.  हरित क्रांतीमुळे उत्पादकता वाढली मात्र दुर्दैवाने बाजार भाव वाढलेले नाहीत असे ते म्हणाले.

मी स्वतः शेतकरी आहे असे अभिमानाने सांगत श्री नितीन गडकरी म्हणाले की विदर्भात शेती करतो तिथे तीन साखर कारखाने आम्ही चालवतो . तेथील सामाजिक आर्थिक परिस्थिती एक दिवस सुधारेल,अशी स्वप्न पाहिले जात आहेत . त्यासाठी भात उत्पादक हे ऊस उत्पादनाकडे वळतील.त्याच्याकडे पैसे येईल व तेथील आत्महत्या थांबतील.  अशी अपेक्षा आहे.त्यासाठी  ‘व्हीएसआय’ नागपूर मध्ये संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी मी केली होती, व ती पवार साहेबांनी स्वीकारली याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.

हे केवळ पवार साहेबांमुळे घडले

पश्चिम महाराष्ट्राची भरभराट का झाली याचे कारण सांगत श्री नितीन गडकरी यांनी श्री पवार यांचे जाहीर स्तुती केली.  राज्याचा साखर उत्पादक पट्टा यातील विशेषता पश्चिम महाराष्ट्र हा विकासात पुढे गेला.  दरडोई उत्पन्न वाढले हे केवळ उसामुळे झाले आहे.  व्हीएसआयचे व विशेषतः या संस्थेचे नेतृत्व  आदरणीय शरद पवार साहेब आहेत असे श्री गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले..

–  जैवऊर्जा उद्योगात साखर उद्योगाला रूपांतरित करावे लागेल.

– हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन राहील. ‘टाटा’ने हायड्रोजनवर चालणारा ट्रक तयार केला आहे.

– हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठी वाहनांच्या फ्लेक्स इंजिन येतील.


– बायोसीएनजीवर चालणारा जेसीबीदेखील जगात तयार झाला आहे.

–  हवाई जैव इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने देखील वळायला हवे.

– बायोसीएनजी आता ट्रॅक्टर, ट्रकमध्ये वापरला जातो. त्याचा वापर पुढे वाढत जाणार.

– शेतकरी आधी अन्नदाता होते. पण ते आता बिटुमीनदाता, हवाई इंधनदातादेखील झाले आहेत.

– साखर उद्योगाने जैव बिटुमीन (डांबर) उत्पादनात उतरावे. द्याल तेवडे आम्ही ते खरेदी करू.

– ८० रुपयांपेक्षा कमी खर्चात हरित हायड्रोजन तयार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

Leave a Reply