शेतात मल्चिंग चा पेपर वापरल्यामुळे तणाची वाढ होत नाही व त्यामुळे तण काढण्याचा खर्च वाचतो शेती पद्धतीमध्ये काळानुसार खूप मोठे बदल होत आहेत नवीन तंत्रज्ञान व आधुनिकरण यामुळे उत्पादन वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा होत आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाण्याची कमतरता तसेच पाऊसमान कमी त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे मल्चिंग पेपरचा वापर करणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
मल्चिंग पेपरचे वापरायचे फायदे
मल्चिंग पेपर चा वापर हा फळबागा भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांच्या आच्छादनासाठी केला जातो याच्या वापरामुळे शेतात तणाची वाढ होत नाही त्यामुळे तन काढणीचा खर्च वाचतो तसेच मल्चिंग पेपर वापरल्यामुळे उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवनही होत नाही. सध्या सर्व शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपर चा वापर वाढत आहे त्यामुळे सरकारने यावर अनुदान सुरू केलेले आहे. फलोत्पादन योजना अंतर्गत 50 टक्के अनुदान मल्चिंग पेपर साठी सरकार देणार आहे.
कसे आहे अनुदान
सरासरी प्रती हेक्टरी क्षेत्रासाठी मल्चिंग पेपर टाकण्यासाठी 32 हजार रुपये खर्च येतो या योजने अंतर्गत सरकार 50% अनुदान देत आहे म्हणजेच 16 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जात आहे . यामध्ये वैयक्तिक लाभही शेतकरी घेऊ शकतात त्याचप्रमाणे शेती उत्पादक कंपनी सहकारी संस्था शेतकरी समूह बचत गट यांना देखील अर्थसहाय्य केले जाते.
या कागदपत्रांची आवश्यकता
1. आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स .
2. आधार कार्डची झेरॉक्स
3. संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु. जमाती प्रवर्गाकरिता )
4. तुमच्या जमीनीचा सातबारा
5. ८ अ
कुठे करायचा अर्ज
मल्चींग पेपरसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.शेतकऱ्यांना मल्चींग पेपरसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईड जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच या योजनेसंदर्भात अधीक माहितीसाठी कृषी अधिकारी मंडळ , तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.