दोन हजार रुपयांच्या नोटा आता आरबीआयने मागे घेण्याची घोषणा केलेली आहे,पण ती कशासाठी हा प्रमुख प्रश्न तुम्हाला पडू शकतो. 8 नोव्हेंबर 2016 रात्री आठ वाजून काही मिनिटं झाले होते जेव्हा नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की पाचशे आणि हजाराच्या नोटा ज्या आहेत त्या यापुढे चलनात राहणार नाहीत आणि त्याच वेळी दोन हजाराच्या नोटा सुद्धा उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं होतं 2016 मध्ये या दोन हजार रुपयांच्या नोटांची घोषणा झाली त्या चलनात आल्या त्यानंतर 2018 19 मध्ये त्यांची छपाई ही बंद केली गेली कारण त्यांचा प्रमुख उद्देश होता बाकीच्या चलनात असलेल्या नोटाचा काळा पैसा वाढत होता त्याला आळा घालणं.
2018 – 19 मध्ये म्हणजे साधारण दोन ते तीन वर्षांमध्ये यांची छपाई रिझर्व बँकेने बंद केली आणि ती क्लीन नोट पॉलिसी यांच्या अंतर्गत आरबीआयने मागे घेण्याची घोषणा केली आहे, ती क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय तर बाजारात पुरेशा नोटा उपलब्ध आहेत ना याची खातरजमा करून घेत पाचशे , शंभर, दोनशे, दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटा भरपूर प्रमाणात आहेत असे म्हणत त्यांनी आता हे दोन हजार रुपये चे चलन मागे घ्यायचे ठरवले आहे , कारण दोन हजार रुपयाची नोट असली तरी तिचा वापर फारसा होताना दिसत नाही आस त्यांचं म्हणणं आहे.
दोन हजार रुपयाची नोट रद्द झाली आहे का आणि नोटा कधी पर्यंत बदलून घेऊ शकतो ?
सहाजिकच पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे सध्याच्या दोन हजार रुपयाची नोट रद्द झालेल्या आहेत का तर याचा अगदी साधं सरळ उत्तर आहे नाही, तुमच्याकडे जर दोन हजार रुपयाची नोट असेल तर ती अजूनही वैध चलन आहे वैद्य चलन म्हणजे काय तर त्याचा वापर तुम्ही व्यवहारात करू शकता आणि या नोटा रद्द झाल्या नाहीत आत्ताच्या घडीला तुम्ही त्यांची देवाणघेवाण ही करू शकता जर तुम्ही दुकानात गेलात,हॉटेलमध्ये गेलात कुठे ही गेलात तर तिथे तुम्ही हि दोन हजार रुपयांच्या नोटा बिल भरण्यासाठी किंवा आपलं पेमेंट करण्यासाठी म्हणून देऊ शकता. दुकानदाराने तुम्हाला दोन हजाराची नोट परत दिली तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मग आरबीआयने सप्टेंबर ची मुदत दिलेली आहे ही मुदत नेमकी कशासाठी दीलेली आहे तर 30 सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बँकेत जमा करा असा किंवा बदलून घ्या असं आरबीआयने सांगितलेलं आहे. आता दोन गोष्टी बघा,नोटा रद्द झालेल्या नाहीत तरीसुद्धा 30 सप्टेंबर ची मुदत ही दिलेली आहे तर ती कशासाठी आहे तर तुम्ही या दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन त्याबदल्यात इत्तर नोटा घेऊ शकता किंवा पैसे आपल्या खात्यात तिथे जमा करू शकता.
नोट बदलणे कधी पासून सुरु होणार आणि एका वेळी किती रुपये जमा करू शकता ?
आता 30 सप्टेंबर ची मुदत बद्धल माहिती आपल्याला झाली पण हे सुरू कधी होणार आहे तर 23 मे 2023 पासून बँकांमध्ये तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता किंवा जमा करायला जाऊ शकता , बँकांना थोडा अवधी मिळावा म्हणून 23 मे पासन ही गोष्ट केली जाणार आहे आजची तारीख 19 मे म्हणजे चार दिवसांचा अवधी बँकांसाठी दिलेला आहे ते 20 मेपासून बांका तुम्हाला या नोटा बदलून घेऊ शकतील किंवा जमा करून घेतील आता नोटांवर मर्यादा आहे का म्हणजे एका वेळेला तुम्हाला आठवत असेल बंदी झाली होती किती पैसे काढता येणाऱ्या मर्यादा होती तर आता दोन हजारच्या नोटा बँकेत जमा करणे यावर खूपच मर्यादा आहे का तर होय हे सुद्धा बँकेने सांगितलेला आहे एका वेळेला वीस हजार रुपयांच्या 2000 च्या नोटा तुम्ही जमा करू शकता.
इत्तर बँक मध्ये नोटा बदलून मिळणार का ?
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की समजा तुमच्या बँकेत खात आहे तिथे तुम्हाला जाता येणे शक्य नाही तर आसपास असलेली कुठली बँक जिथे तुम्हाला सोयीचा आहे जाणं तेथे तुम्हाला या नोटा बदलून मिळतील का तर मिळतील तिथे सुद्धा ही सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे, पण तुम्हाला त्यासाठी तुमच्या बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक केलं असणे हे आवश्यक आहे.
नोटा बद्धलने मुदतीत शक्य न झाल्यास किंवा बँकांनी नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास ?
30 सप्टेंबरपर्यंत मुदत चार महिन्यांची मुदत आहे ही मुदत उलटून गेली तर काय करायचं तर आरबीआयने असं म्हटलेलं आहे की चार महिन्यांचा अवधी यावेळेला दिलेला आहे त्यामुळे नागरिक ना असा आवाहन आहे की त्यांनी या चार महिन्यांच्या अवधीत आपल्या नोटा जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात हा काळ उलटून जातोय याची वाट बघत त्यांनी बसू नये जर बँकांनी या नोटा बदलून द्यायला जमा करून घ्यायला नकार दिला तर अर्थातच आरबीआय काय हे सांगत आले आहे की जर बँका त्यांचं काम करत नसतील तर इकडे संपर्क करा आणि ते यासंबंधी तुम्हाला मदत करू शकते त्यामुळे आज जे प्रेस नोट काढलेली आहे त्याच्यात त्यांनी https://cms.rbi.org.in/ स्थळावर तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता जर बँका तुम्हाला सहकार्य करत नसतील तर पण सगळ्या बँकांना ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी म्हणून आरबीआयने सूचना दिलेले आहे.