या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे असं असतानाच सर्वांसमोर आनंदाची बातमी आली आहे.
मागच्या वर्षी अंदमनात मान्सूनचे आगमन 22 मे रोजी झाले होते. हवामान खात्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मात्र वीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल असे सांगितले होते.परंतु सर्वांचा अंदाज चुकवत मान्सून मात्र 19 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाला म्हणजे 24 तास आधी पावसाला सुरुवात झाली.
शुक्रवारी दुपारी हवामान खात्याने हे स्पष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झालेले आहे मान्सून हा अंदमान सागरात दाखल झाला असून तो बंगालच्या उपसागरातही दाखल झाला आहे व तो वेगाने प्रगती करत आहे.
यापुढेही तो बंगालच्या उपसागरातून पुढे अंदमान आणि निकोबार बेटापासून पुढे जाईल असे हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे तसेच डॉक्टर के एस हो चाळीकर यांच्या हवामान अंदाजानुसार मान्सून हा केरळात 4 जून रोजी येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आता लवकरच राज्यात देखील पाउस पडेल.त्यामुळे शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावेत याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.