कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, असा करा अर्ज आणि घ्या लाभ ..

कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, असा करा अर्ज आणि घ्या लाभ ..

सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेक योजना राबवत असते. अशीच एक योजना आहे. ती म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्डवर हमीशिवाय 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळते.

ही योजना विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे .जे पशुपालन करतात. या योजनेच्या मदत तिने शेतकरी गाई, म्हैस, कोंबडी, बकरी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

या कागदपत्रांची आवश्यकता

शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतो. जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या बँकेतून एक फॉर्म आणावा लागेल. आणि तो आवश्यक कागदपत्रांसह भरून द्यावा लागेल. यासाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे यासाठी जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, विमा उतरवलेल्या जनावरांवर कर्ज, जनावरांच्या खरेदीवर कर्ज बँकेचा क्रेडिट  स्कोअर/कर्ज इतिहास अर्जदाराचे आधार कार्ड ,पॅन कार्ड मतदान कार्ड, मोबाईल नंबर पासपोर्ट साईजचा फोटो.

कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध

या योजनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज लागणार आहे. जर तुम्ही खाजगी बँकांकडून पशुपालनासाठी कर्ज घेत असाल. तर 7 टक्के व्याजदराने द्यावे लागेल. या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांवर वेगवेगळी रक्कम उपलब्ध आहे. 

कोणत्या जनावरांवर किती कर्ज? 

उदाहरणार्थ तुम्हाला गाई वर ४० हजार रुपये कर्ज मिळेल. म्हशीवर तुम्हाला 60000 पर्यंत कर्ज मिळते .तसेच मेंढ्या आणि शेळ्यांवर 4000 च्या वर कर्ज मिळते. आणि कोंबड्यांवर सातशे रुपये पेक्षा जास्त कर्ज मिळते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *