कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मराठवाड्यात या पाच दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे .येत्या 24 तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता.
राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होता तर काही भागात जोरदार पावसाचा मोठा खंड आहे.
आज मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, सिकर, ओराई ,अंबिकापुर, सिद्धी ,बालासोर, भागात होता हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागराच्या भागात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती ही पश्चिम झारखंड तसेच उत्तर छत्तीसगड, ओडिशा येथे झालेली आहे.
बंगालचे उपसागरामध्ये पुढील 48 तासांमध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काल राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या विदर्भ, कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठीक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडल्या.
पुणे जिल्ह्यात ही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे . ऑरेंज अलर्ट म्हणजे या जिल्ह्यातील हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रावर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असते.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, भंडारा, गोंदिया ,आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.