राज्यात मेगाभरतीला सुरवात! , सहकार, महसूलसह झेडपी, महापालिका नगरपरिषदांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध , जाणून घ्या अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, शिक्षण ?

राज्यात मेगाभरतीला सुरवात! , सहकार, महसूलसह झेडपी, महापालिका नगरपरिषदांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध , जाणून घ्या अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, शिक्षण ?

जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींची नोकरीची प्रतीक्षा आता संपणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या 340 जिल्हा परिषदेतील 639 पदांची भरती जुलै अखेरीस होणार आहे. त्यामध्ये ज्युनिअर अभियंता लिपिक अशा पदांचा समावेश आहे .दुसरीकडे सहकार महसूल व शिक्षण खात्यातील भरती देखील आता टीसीएस कंपनीद्वारे भरली जाणार आहे.

लिपिक पदासाठी इंग्रजी व मराठी टायपिंग बंधनकारक आहे. इतर गट -क संवर्गातील पदांसाठी बारावी ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण बंधनकारक आहे. जिल्ह्यामधील जिल्हा परिषद सह खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांची साडेसातशे पदांची भरती होणार आहे. मागील सात वर्षापासून सरकारी नोकरी साठी वाट पाहणाऱ्या तरुणांना आता पुढील तीन महिन्यात वेगवेगळ्या शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने आता शासकीय पद भरतीला मंजुरी दिली आहे. विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आता महसूल विभागाकडून तलाठी भरती सुरू असून सहकार विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

सहकार विभागाकडून गट -क संवर्गातील गट – क सहकारी अधिकारी श्रेणी 1  व श्रेणी 2 ची पदे भरली जाणार आहेत . तसेच वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी ,लघुलेखक निम्न श्रेणी ,लघुलेखक व लघु टंक लेखक अशा पदांचाही यात समावेश आहे . त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता 21 जुलै पर्यंत आहे.

यानंतर जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका नोकर भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध होणार आहे. याच दरम्यान संच मान्यता झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुकांनी या दृष्टीने तयारी करणे आवश्यक आहे.

ठळक बाबी

खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 38 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 आहे.

प्रकल्पग्रस्त दिव्यांग भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 इतकी आहे.

3 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सरळ सेवा पद भरतीच्या जाहिरातीसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष सवलत आहे.

1000 प्रतीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी आहे , तर इतर संवर्गातील प्रत्येकी 900 रुपयांची शुल्क असणार आहेत.

सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषदेतील 1000 पदांची सरळ सेवा भरती होणार आहे.

जुलै अखेरीस टीसीएस द्वारे होणार पदभरती.

महापालिका व जिल्हा परिषदेचे राज्य शासनाच्या वतीने भरली जाणारी पदे टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी टीसीएस कंपनीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत स्वतःची खाते तयार करणे आवश्यक आहे.

महानगरपालिकेने व जिल्हा परिषदेने शासनाच्या मंजुरीनंतर भरती होणारे पदे व परीक्षेचा अभ्यासक्रम कंपनीला दिला आहे.

जुलै अखेरीस ही पद भरती सुरू होईल असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तलाठी भरतीची मुदतवाढ

राज्यातील तलाठी भरतीसाठी 18 जुलै पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना अर्ज करता आले नाहीत . या उमेदवारांनी मुदत वाढीची मागणी केली होती . त्यानुसार महसूल व वन विभागाने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता 20 जुलैपर्यंत मुदतवाढ दिले आहे.  साडेचार हजार जागांसाठी सध्या दहा लाखापर्यंत उमेदवारांचे अर्ज आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *