केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या प्रगती करिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी ज्या योजना राबवण्यात येतात त्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते.
यांत्रिकीकरणाशी संबंधित तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उभ्या करता याव्यात याकरिता देखील राज्य सरकारच्या योजना आहेत . तसेच फळबाग लागवडीकरिता देखील काही योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.
या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे असते. जर आपण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विचार केला तर ही योजना शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देते.
आर्थिक मदत देखील करते.
याच योजनेच्या संदर्भात नांदेड जिल्ह्यामध्ये 2022 -23 व 23 ते 24 या आर्थिक वर्षांमध्ये 1428 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. या प्रक्रियेत 369 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्व समिती मिळाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांनी ते अपलोड करावीत . व त्यामुळे त्यांना पूर्व समिती मिळेल या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आकारमानुसार अनुदानाची रक्कम देण्यात येते.
या योजनेसाठी पात्रता
तुम्हाला देखील या योजनेच्या अंतर्गत शेततळे खोदायचे असतील तर त्यासाठी काही पात्रता आहेत. त्यातील एक महत्त्वाची पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी0. 40 हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे.
ज्या जमिनीवर शेततळे होणार आहेत. ती जमीन आवश्यक तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार लाभार्थ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळी या घटकाकरिता अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
अशा पद्धतीने होते निवड
या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल तर याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे . याकरता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून देखील अर्ज करू शकतात. किंवा सीएससी सेंटर किंवा ग्रामपंचायतीमधील केंद्रावर जाऊन सदर संकेतस्थळावर अर्ज करावा या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता जे काही अनुदान उपलब्ध असेल त्याप्रमाणे मध्ये संगणकीय प्रणालीतून सोडत नुसार अनुदानाचा लाभ घेण्यात येतो.
शेतकऱ्याची विविध आकारमानाने मिळणारे अनुदान
1. पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर आकाराची शेततळ्यासाठी 28 हजार 275 रुपये.
2- वीस बाय पंचवीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 31 हजार 598 रुपये
3- वीस बाय वीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 41,218 रुपये
4- 25 बाय वीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 49 हजार 671 रुपये
5- 25 बाय 25 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्याकरिता 58 हजार 700 रुपये
6- 30 बाय 25 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 67 हजार 728 रुपये
7- 30 बाय 30 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्याकरिता 75 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.