राज्य सरकारने नवे वाळू धोरण जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारच वाळू विक्री करणार आहे. यातून राज्यभरामध्ये सुमारे 65 वाळू डेपो तयार करण्यात आले असून ,नागपूर विभागात सर्वाधिक 35 वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रकचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.
तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारने वाळू विक्रीचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार सहाशे रुपये या दराने वाळू विक्री करण्यात येत आहे. राज्यभरामध्ये सुमारे 65 वाळू डेपो तयार करण्यात आले असून नागपूर मध्ये 35 वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सोळा तालुक्यांमध्ये हे डेपो उभारण्यात आले आहेत.
यापूर्वी राज्यात लिलाव पद्धतीने वाळू विकली जात होती. मात्र ज्या ठिकाणी वाळू उपसा होत होता अशा ठिकाणी या लीलावांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नवीन वाळू धोरणानुसार ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता आहे. आणि वाळूचे लिलाव झालेली नाहीत अशा ठिकाणी वाळू डेपो तयार करण्यास जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
नद्यांच्या प्रवाहात मध्यभागापर्यंत सहसा वाळू उपलब्ध होत नाही . परंतु मध्य भागापासून तिच्या शेवटच्या स्थानापर्यंत वाळूची उपलब्धता जास्त दिसून येते. त्यामुळेच राज्यातील नागपूर विभागांमध्ये असलेल्या बहुतांश नद्यांमध्ये वाळूची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या 65 वाळू डेपोपैकी सर्वाधिक वाळू डेपो हे नागपूर विभागात आहेत . पुणे विभागाचा विचार करता सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्यांना त्यांच्या पात्रामध्ये वाळू उपलब्धता कमी आढळते म्हणून या ठिकाणी वाळू डेपोची संख्या कमी दिसून येत आहे.
राज्य सरकारने वाळू विक्री करताना आता महाखनिज या संकेतस्थळावरून वाळू विक्री उपलब्ध करून दिली आहे . त्यानुसार नोंदणी केल्यानंतर आपल्याला हव्या त्या ठिकाणी च्या वाळूची खरेदी करता येते. त्याचप्रमाणे त्या वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रक देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वाळू खरेदी केल्यानंतर संबंधित ट्रकचा क्रमांक निवडल्यानंतर ठराविक काळामध्ये त्या ट्रकच्या माध्यमातून आपल्याला घरपोच वाळू मिळू शकते. ट्रकचे भाडे मात्र संबंधित मालकाशी बोलल्यानंतर व भाडे दिल्यानंतर ही वाहतूक करून मिळते.
राज्य सरकारने महाखनिज या संकेतस्थळावर सर्व डेपोंमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या वाळूची ब्रास मध्ये माहिती मिळते . दररोज विक्री होणाऱ्या वाळूची व निर्माण होणाऱ्या वाळूची देखील या संकेतस्थळावर माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांना या संकेतस्थळाचा मोठा फायदा होत आहे.
उपलब्ध वाळू डेपो
राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती, यांनी छत्रपती संभाजीनगर, सुरू करण्यात आलेले आहेत.