मागच्या दोन तीन आठवड्यापासून राज्यात पाऊस नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. पण आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सांगणार आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये 18 ऑगस्टपासून पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मग राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ? मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी कायम आहे . ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, ही स्थिती दक्षिणेकडे झुकलेली असून समुद्र सपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर आहे.
त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे निर्माण होण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश आणि शेजारच्या भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून3.1 ते 5.8 किलो मीटर उंचीवर आहे.
राज्यात पावसासाठी काल पोषक हवामान नव्हतं त्यामुळे बहुतांश भागात उघडीप होती. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे . म्हणजे भुर भुर पडली आहे. हवामानशास्त्र विभागाने राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे.
आज पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान अंदाज आणि वर्तवलेले आहे. मराठवाड्यात व विदर्भ या ठिकाणी पाऊस सुरू होईल मराठवाडा व विदर्भात ठीक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
अकोला ,बुलढाणा, वाशिम ,अमरावती, यवतमाळ ,वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, परभणी ,जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . राज्याच्या इतर भागातही ठीक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्याच्या इतर भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील शनिवारी या जिल्ह्यांसह लातूर, धाराशिव ,मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस वाढेल . शनिवारी या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.