दोन आठवड्यापासून राज्यांमध्ये विविध ठिकाणी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा चिंतेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता कृषी आयुक्तांनी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
५३ मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई .
तर पहा पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड झालेला आहे. त्यामुळे कृषी आयुक्तांनी सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप पिक विमा योजनेत 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीने नुकसानभरपाई म्हणून पीक नुकसान भरपाईच्या 25 टक्के रक्कम आगाऊ दिली जाते.
आणि निकष गृहीत धरूनच राज्यातील 13 तालुक्यातील मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबत चे सर्वेक्षण करावे असे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे . उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरणा रखडलेल्या आहेत.
आतापर्यंत 91 टक्के अर्थात एक कोटी 32 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र जुलैच्या तिसरा आठवड्या नंतर पावसाने दडी मारली हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कापूस ,भात, सोयाबीन ,तूर या महत्त्वाच्या पिकांवर थेट परिणाम झाला आहे .
राज्यातील 13 तालुक्यामधील ५३ मंडळामध्ये पावसाचा खंड हा 22ते 25 दिवसाचा झाला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसाठी तसेच उत्पन्नावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्याने यंदा एक रुपया पीक विमा काढला आहे .
शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना या मंडळातील पिकांचे सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. त्याचा अहवाल विमा कंपन्यांना देऊन अधिसूचना काढली असे निर्देशही दिले आहेत.
तर पहा २१ दिवसापेक्षा जास्त जिल्हानिहाय मंडळ कोणते कोणते आहेत?
राज्याने यंदा प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्यानंतर २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते.
या निकषानुसार राज्यातील अहमदनगर,अमरावती, अकोला, जळगाव,संभाजीनगर, पुणे , बुलढाणा, जालना, परभणी, सांगली, सातारा व सोलापूर, नाशिक,या १३ जिल्ह्यांमधील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसांचा झाला आहे.
जिल्हा तालुका मंडळ संख्या.
अहमदनगर :- कोपरगाव 3
अकोला :- अकोला, अकोट ,बाळापुर ,बार्शी टाकळी ,मूर्तिजापूर 6
अमरावती :- दर्यापूर 1
औरंगाबाद :- औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर 12
बुलढाणा :- जळगाव जामोद, शेगाव ३
जळगाव :- अमळनेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर , यावल ९
जालना :- बदनापूर-, घनसांगवी, जालना ७
नाशिक :- देवळाली-, सिन्नर २
परभणी:- सेलू १
पुणे :- बारामती १
सांगली:- आटपाडी , जत , खानापूर विटा ३
सातारा :- माण दहीवडी, फलटण ४
सोलापूर:- माळशिरस १