शेतकरी बंधूंना कुठल्याही हंगामाच्या सुरुवातीला शेतीसाठी वेळेत पैसे हातात असणे खूप आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा बाजारभाव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे मालाचा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक फटका बसतो.
बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातात कष्ट करून देखील पैसे राहत नाही. त्यामुळे शेतकरी पिक कर्ज किंवा आर्थिक संस्थांमधून कर्ज घेत असतो परंतु ते कर्ज देखील बऱ्याच वेळेस वेळेवर मिळत नाही. ही सगळी परिस्थिती समोर ठेवूनच शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून ही एक फायदेशीर योजना असून शेतकऱ्यांना यामधून कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. किसन कार्ड प्रामुख्याने देशातील सरकारी बँकांच्या माध्यमातून देण्यात येते. परंतु आता देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेली ॲक्सिस बँकेने देखील किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे . या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
किसान क्रेडिट कार्ड ॲक्सिस बँक लॉन्च करणार
ॲक्सिस बँकेने खास किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली असून रिझर्व बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब या रिझर्व बँक ऑफ इंडियाची उप कंपनी असलेल्या कंपनीच्या सहकार्याने ॲक्सिस बँकेने दोन कर्ज देणारी उत्पादने सुरू केली आहेत. यापैकी एक म्हणजे ॲक्सिस बँकेचा क्रेडिट कार्ड आणि दुसरे म्हणजे ॲक्सिस बँक एमएसएमइ कर्ज होय.
ॲक्सिस बँक किसान क्रेडिट कार्ड
ॲक्सिस बँक ही फ्रिक्शनलेस क्रेडिट अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड सुरू करत असून हे कार्ड पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे. या क्रेडिट कार्ड साठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून हे कार्ड लॉन्च केले जाणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना 1.6 लाख क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत.
ॲक्सिस बँक एमएसएमई कर्ज
ॲक्सिस बँकेने किसान क्रेडिट कार्डच नाही तर लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी असुरक्षित एम एस एम इ कर्ज उत्पादन सुरू केले आहे. हे देखील पूर्णपणे डिजिटल असणार आहे. अंतर्गत ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.विशेष म्हणजे ॲक्सिस बँकेने ही कर्ज उत्पादने हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या पिटीपीएफसी अंतर्गत लॉन्च केली आहेत. यामुळे अधिक सुरक्षित पद्धतीने ग्राहकांची माहिती मिळू शकेल.
या माध्यमातून आता आधार इ केवायसी, पॅन व्हेलिडेशन, जमीन दस्तऐवजांची पडताळणी, अकाउंट ॲग्रीकेटर डेटा आणि आणि बँक खाते प्रमाणित करण्याकरिता पेनी ड्रॉप सेवेची सुविधा मिळणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना जलद आणि चांगली क्रेडिट सेवा दिली जाईल अशी बँकेला अपेक्षा आहे व त्यानंतर आणखी नवीन उत्पादने बँक याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लॉन्च करण्याची शक्यता आहे.