उत्पन्नाचा दाखला शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी, किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बरेचदा उत्पन्नाचा दाखला (इन्कम सर्टिफिकेट) मागितले जाते . हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते याबद्दल आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक योजना तसेच इतर कामासाठी लागतो. उत्पन्नाचा दाखला म्हणजे कुटुंबाचे वर्षाचे सर्व ठिकाणावरून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे या दाखल्यामध्ये दिलेले असते.
तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला महा-ई सेवा केंद्र किंवा सेतू मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच तलाठी यांच्याकडील उत्पन्नाचा अहवाल लागतो . हा अर्ज नागरिक मोबाईल वरून सुद्धा काढू शकतात . याकरिता शासनाने नागरिकांसाठी आपले सरकार महा ऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टल वरती नागरिकांना विविध शासकीय दाखले इतर उपयुक्त अशा सेवा वितरित केल्या जातात. उदाहरणार्थ दुकान परवाना, शासकीय दाखली, ग्रामपंचायत सेवा इत्यादी.
उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
अर्जदाराची नाव, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि मतदान कार्ड.
तलाठी उत्पन्न दाखला.
अहवाल, आयकर विवरण पत्र,
एक फोटो ,रेशन कार्ड, सातबारा ,आठ अ उतारा ,लाईट बिल ,कर पावती, आणि रहिवासी घोषणापत्र.
तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याकरिता संपूर्ण वाचा..
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल वरती https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ही वेबसाईट सुरू करावी.
त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पर्याय दिसेल. त्यावरती नवीन युजर येथे नोंदणी करा असा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून नोंदणी करून घ्या.
नोंदणी करण्यासाठी दोन पर्याय येतील. त्यामधील पहिला पर्याय एक निवडा. आणि आपला जिल्हा व मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा यावर क्लिक करा.
त्यानंतर ओटीपी टाका व कोणताही युजरनेम आपण टाकू शकता. त्याखाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल त्यामध्ये लक्षात राहील असा पासवर्ड टाका.
त्यानंतर इंग्लिश मध्ये आपले नाव टाकावे. पुढच्या चौकोनात मराठीमध्ये नाव येईल.
पुढच्या चौकोनात आपली जन्मतारीख टाका. खालील चौकोनात क्लिक करून नोंदणी करा या बटनावर क्लिक करा.
आपली नोंदणी यशस्वी होईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा होम पेज सुरू करायचे आहे, व नोंदणी करतेवेळी टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकायचे आहे . तसेच जिल्हा निवडून लॉक इन करा.
उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा -2
लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील . त्यामधून आपण महसूल विभाग वरती क्लिक करायचे आहे.
त्यामध्ये तुम्हाला उपविभागांमध्ये महसूल सेवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
महसूल सेवांमध्ये उत्पन्न दाखला मिळकत प्रमाणपत्र हा ऑप्शन दिसेल तो निवडावा व पुढे जा. या ऑप्शन वर क्लिक करावे.
पुन्हा तुम्हाला उत्पन्न दाखला पर्याय निवडावा लागेल आणि पुढे जा या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार याची माहिती दिसेल यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा.
मोबाईल मध्ये एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्न दाखला किती वर्षाचा काढायचा आहे. हे निवडावे लागेल उदाहरणार्थ एक वर्ष तीन वर्ष.
अर्जदार याची वैयक्तिक माहिती. अर्ज चा पत्ता, कुटुंबाची माहिती, उत्पन्नाचा दाखला कोणासाठी काढायचा आहे व कारण इत्यादी माहिती व्यवस्थित व अचूकपणे भरावी.
शेती असेल तर त्याबद्दल माहिती भरावी लागेल. त्यानंतर उत्पन्न बद्दलची माहिती भरावी लागेल व आपण तलाठी उत्पन्न दाखला सोबत जोडणार असाल तर तलाठी अहवाल पर्याय निवडावा.
अटी मान्य आहे . या चौकोनामध्ये क्लिक करावे व त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कागदपत्रे कशी अपलोड करावी..
सर्वप्रथम अर्जदाराचा फोटो व सही अपलोड करायची आहे.
वरती सांगितलेले कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना वाचूनच कागदपत्रे अपलोड करावीत फोटो व सही तसेच इतर कागदपत्रे यांच्या सूचनेनुसार असावेत.
कागदपत्रे अपलोड नंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल शुल्क भरल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.