द्राक्षवेलींची ऑक्टोबर छाटणी करणे आणि खोडावर गर्डलिंग करणे, नियोजन पहा सविस्तर ..

द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी करताना द्राक्षाच्या छाटणीनंतर काडीची वाढ कशी झाली आहे.  पक्वता कितपत आली आहे ते तपासून पाहणे आवश्यक असते.  छाटणी करते वेळेस जमिनीची अवस्था तसेच त्यावेळी चे हवामान कसे आहे. याबद्दलची माहिती असणे आवश्यक असते.  हवामान ढगाळ असेल पाऊस पडत असेल तर छाटणीचे काम पुढे ढकलावे लागते . याबाबतची माहिती असणे आवश्यक असते.

द्राक्षाच्या कोणत्या जातीच्या काडीवर किती डोळे राखून छाटणी केल्यास अधिक घड लागतात.  तसेच पक्की काडी, कच्ची काडी ,आखूड काडी ,लांब काडी म्हणजेच काय याचीही माहिती असणे आवश्यक असते.  कितव्या डोळ्यापर्यंत सूक्ष्म घड निर्मिती झाली याची खात्री करून घेण्यासाठी ऑक्टोबर छाटणी पूर्व दहा ते पंधरा दिवस काडी वरील डोळे तपासणी आवश्यक आहे . यासाठी सामान्यपणे सहा ते नऊ डोळे तपासावेत.

ठराविक पद्धतीमध्ये गोलाकार द्राक्ष वेलीच्या खोडावरील साल काढली असता.  पानात तयार झालेले अन्न मुळाकडे वाहून जाण्याची क्रिया काही काळ बंद करून वेलीवरील घड वाढीसाठी ही अधिक अन्नाचा पुरवठा उपलब्ध करून देता येतो.  घडाचे वजन तसेच गुणवत्ता यामध्ये वाढ मिळवता येते .जोमदार घडवाढीच्या सुरुवातीला  अशी क्रिया केल्यास उत्पादनात चांगली वाढ आणि गुणवत्ता मिळवता येते.

गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्याचे उद्देशाने गर्डलिंग ऑक्टोंबर छाटणीनंतर घडात फळधारणा झाल्यानंतर लगेच करावे . फळधारणा होऊन गेल्यानंतर आणि घडांचे शेंडे खुडून झाल्यानंतर गर्डलिंग करावे.  बागेतील 70 ते 80 टक्के घडांची अवस्था याप्रमाणे आलेली आहे.  हे तपासून गर्डलिंग  करावे . ज्या वेलीची छाटणी एका दिवसात झालेली आहे . तेवढ्या वेलीवर गर्डलिंग एकाच दिवसात करण्याचा प्रयत्न करावा.

गर्डलिंग मुळे एकूण वजनात्मक आणि गुणवत्तामक वाढ मिळवता येते.  व द्राक्ष पिकाच्या काळात अनावश्यक रसायने आणि संजीवके यांचा वापर टाळता येतो. आणि उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेता येते.

प्रक्रिया पद्धत:

(अ) द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी:

(१) द्राक्षाच्या वेलीं वरील सर्व काड्यांच्या शेंड्यांकडील सगळी पाने काढून टाकावी .

(२) ज्या काड्या हिरव्या असतील तसेच अपक्व,असतील रोगट असतील त्या सर्व काड्याना तळातून छाटून टाकावेत .

(३)ज्या काड्यांना टपोरे व फुगीर डोळे आहेत अशा काड्या सहा ते नऊ डोळ्यांपर्यंत राखून छाटा.वेगवेगळ्या अंतरावरील गाड्यांची आणि डोळ्यांची संख्या जातीप्रमाणे राखा

(४) काड्या छाटल्यानंतर उरलेल्या काडीच्या शेंड्याकडील 3-4 डोळ्यांना काळी बोर्डो पेस्ट लावा किंवा हायड्रोजन सायनामाईड वापरा. हे छाटणीनंतर ताबडतोब वापरावे. यासाठी 10 लीटर पाण्यात 200-300 मिली. हायड्रोजन सायनामाईड मिसळा व फवारणी करा.

(५) काड्यांच्या तळावर ,ओलांड्यावर, वेलीच्या खोडावर, बोर्डो पेस्ट लावा.

(६) छाटलेला सर्व काही भाग गोळा करून बागेच्या बाहेर टाकावे व नष्ट करावे

(आ) द्राक्ष खोडावर गर्डलिंग करणे

(१) ज्या द्राक्ष वेलीवरील बहुतेक गडांमध्ये फुल धारणेची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा वेलींची निवड करावी ज्यावेळी गर्डलिंग केले जाते त्यावेळी जमीन ओलसर असावी.  कोरडी जमीन असेल तर साल चांगली निघत नाही.  त्यामुळे आतल्या भागांमध्ये इजा होण्याची शक्यता असते. 

(२) ज्या निवडल्या वेली आहेत त्यांच्या खोडावर जमिनीपासून वरच्या बाजूला वेलीच्या मध्यभागात मोकळी साल काढून सुमारे वीतभर भाग साफ करा.

(३) या ठिकाणी फक्त साल कापली जाईल असा चाकूने गोलाकार काप घ्या.

(४) घेतलेल्या कापाच्या खालच्या बाजूला २ मिमी. अंतरावर पहिल्या कापास समांतर असा संपूर्ण सालीस गोलाकार काप द्या.

(५) दोन्ही कापांमधील साल मोकळी करून काढून टाका.

(६) गर्डलिंग केलेल्यानंतर त्या जखमेवर ब्रशने बोर्डो पेस्ट लावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *