गेल्या हंगामातील एफआरपी पेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. त्यामध्ये आठ कारखान्यांनी आरएसएफच्या (रेव्ह्युन्यू शेअरिंग फॉर्म्युला-उत्पन्न वाटप सूत्र प्रक्रियेत गुरफटून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याऐवजी ताळेबंद पत्रकात नफा दिल्यानंतर ते वाटप करणे पसंत केले आहे.
यामुळे आठ कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टन अधिकाधिक पैसे ५६४ ते कमीत कमी दोनशे एकवीस रुपये उत्पादकांना दिवाळी पूर्ण मिळाले आहे . दसरा, या उलट कोल्हापूर जिल्ह्यातील 23 तारखेला मागणी करून आंदोलन करूनही पैसे देण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याचे समोर आले आहे.
प्रति टन 400 रुपये मिळतील.
एफआरपीची रक्कम देऊन शिल्लक राहिलेल्या पैशांपैकी 70 टक्के ऊस उत्पादकांना आणि 30 टक्के कारखाना व्यवस्थापकांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. यासाठी ताळेबंद अंतिम झाल्यानंतर वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट कडे मान्यतेसाठी पाठवला जातो. तेथून साखर आयुक्तांकडे जातो. त्यांच्याकडून अंतिम मंजुरीसाठी ऊस दर नियंत्रण समितीकडे जाते .ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आम्ही ४०० रुपये देऊ शकत नाहीत, असं कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे म्हणणे आहे . या उलट हे काही न करता ताळेबंद अंतिम झाल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता उत्पादकांना देऊन टाकला आहे . यांची कार्यपद्धती अवलंबली तर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकांनाही प्रतिटन ४०० रुपये मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
दृष्टिक्षेपातील साखर उद्योग
एकूण साखर कारखान्यांनी 200
एफ आर पी पेक्षा अधिक पैसे दिलेले कारखाने – ८
एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले कारखाने – ८
सरासरी दैनिक गाळप क्षमता – ८,०१,३०० मेट्रिक टन
एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिलेले कारखाने
माळेगाव (ता.
बारामती) – ५६४
सोमेश्वर (ता. बारामती) – ४९६
प्रसाद शुगर्स (ता.
राहुरी) – १७७विघ्नहर (ता. जुन्नर) – ३२८
पद्मश्री विखे-पाटील (ता. राहाता) – ३५६
सहकार महर्षी थोरात (ता. संगमनेर) – १२१
शंकरराव कोल्हे (ता. कोपरगाव) – २५२
गणेश सहकारी (ता. राहाता) – ४०७
माळेगाव सोमेश्वर साखर कारखान्यांनी प्रत्येक वर्षी टनाला पैसे देण्यात शंभर ते दीडशे रुपयांनी कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा मागे असतात. यावेळी त्यांनी एफआरपीशिवाय दुसरा हप्ता म्हणून 400 पेक्षा अधिक रक्कम दिली आहे. याचाच अर्थ साखर कारखान्यांकडे पैसे आहेत . पण कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार ते द्यायला तयार नाहीत. पण आम्ही उत्पादकांच्या पदरात टाकणार आहे. – राजू शेट्टी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना