नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजला आहे. फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या बाजारात मध्ये फुलांना चांगला भाव मिळत आहे.सणासुदीचा उत्साह सुरू झाला असून, एका मागून एक सण येत आहेत. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून याच पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजले आहे फुलांना मोठी मागणी वाढली आहे.
तसेच सध्या फुलांना बाजारात चांगला दर देखील मिळत आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. सध्या धुळे जिल्ह्यामध्ये फुलांना मोठी मागणी वाढली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये फुलांना मागणी वाढली असून फुलांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची उम्मीद निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सध्या फुलांना जास्त मागणी वाढली आहे. गेले तीन ते चार महिन्यांपासून पिकांना पाणी मिळाले नाही .
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्या वाचून शेतातच उभी जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. अशातच सध्या मात्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे . फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने काहीसा दिलासा त्यांना मिळाला आहे. सध्या बाजारात झेंडूच्या फुलांची विक्री 100 रुपये किलो या दराने होत आहे . दसऱ्यापर्यंत हे भाव 150 ते 200 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे . पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच पावसाळ्यामुळे झालेले नुकसान यामुळे फुलांचे दर यंदा चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक..
सध्या धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांच्या आवक सुरु असून, ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून होत आहे. त्यामुळे एकीकडे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्य फुल खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
राज्यातील बहुतांश शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे . परंतु फुल उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे . फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यामुळे बाजारात फुलांची आवकही 30 ते 40% ने घटली आहे . त्यामुळे फुलांचे भाव वाढले असून झेंडूला किलो 80 ते 100 रुपयांचे दर मिळत आहे . मात्र पावसाचा फटका फुल शेतीला बसल्यामुळे शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुले उपलब्ध नाहीत