गेले सहा महिने दहा हजार पेक्षा जास्त भावाने विकली गेलेली तूर शेतकऱ्यांचा माल बाजारात यायच्या आधीच भाव कमी झाले आहे . भाव गेल्या महिन्याभरात दीड हजार रुपयांनी नरमले ,आयातही सुरू होईल यामुळे तुरीच्या भावावर आणखी दबाव वाढेल, अशी चर्चा आहे.
यावर्षी देशांमध्ये तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आयात वाढीवर मर्यादा आहेत. आणि मागील हंगामातील शिल्लक साठा देखील मर्यादित आहे. त्यामुळे मार्चनंतर तुरीच्या भावामध्ये पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. बाजारात तूर पुन्हा दहा हजाराचा टप्पा गाठील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सर्वात आगोदर आपण तुरीचा भाव आत्ता काय चालू आहे व भावामध्ये किती घट झाली ते पाहू? तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी दहा हजाराच्या दरम्यान होते, पण मागील तीन आठवड्यामध्ये तुरीच्या भावात सतत घट होताना दिसत आहे . सध्या तुरीला सरासरी 8500 रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच जवळपास दीड हजारांची घट झाली आहे.
काही बाजारामध्ये नव्या तुरीला अगदी 7000 पासूनही भाव मिळत आहे. पण सध्या बाजारातील भाव हा 7000 पासून 9000 पर्यंत गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे आहे . जी तूर एका महिन्या आधी बारा हजारांनी विकली जायची तीच तूर आता 9500 रुपयांवर आली आहे.
तर आता हे भाव का कमी झाले त्याचे मुख्य कारण म्हणजे नव्या मालाची आवक. महाराष्ट्र आणि कर्नाटक यामधील काही बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. ही आवक आणखीन एक महिन्यानंतर जास्त होऊ शकते पण नवा माल बाजारात येण्याच्या आधी व्यापारी, स्टाॅकिस्ट आपला माल बाहेर काढत आहेत.
तसेच बाजारात आवक वाढेल शेतकरी पॅनिक सेलिंग करतात त्यामुळे भाव कमी होतात. तसेच आफ्रिका आणि म्यानमार मधून तूर आयात सुरू होईल नेमकी आपली तूर बाजारात येण्याच्या काळात आयतही सुरू होईल. तसेच सरकारही बाजारावर लक्ष ठेवून आहेत. या कारणाने भावावर दबाव आला.
भावावर दबाव कधीपर्यंत राहू शकतो?
तुरीची आवक मुख्यता जानेवारीपासून सुरू होते, आणि मार्च महिन्यापर्यंत बाजारात आवकीचा दबाव असतो,दरवर्षी सर्व शेतकऱ्यांना हा अनुभव येत असतो यंदाही याच काळात बाजारातील आवक जास्त राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मार्चपर्यंत तुरीच्या भावावर दबाव राहू शकतो. म्हणजेच भावपातळी 7000 ते 8000 च्या दरम्यान राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.यंदा उत्पादन घटले. उत्पादन घटल्यापेक्षा महत्वाचं आहे की जे काही उत्पादन हाती आले ते किती काळात बाजारात विकले जाते त्यामुळे विक्रीचा दबाव राहिला तर बाजारावरही दबाव राहू शकतो.
तुरीचे भाव कधीपासून सुधारू शकतात?
देशातील बाजारामध्ये तुरीची आवक ही मार्च महिन्यापर्यंत राहू शकते असा अंदाज आहे. मार्च महिन्यानंतर बाजारातील आवकही कमी होत जाईल. बाजारातील आवक कमी झाल्यामुळे दराला आधार मिळू शकतो मार्च नंतर बाजारात सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
तुरीचे भाव कशामुळे तेजीत राहू शकतात?
देशामध्ये यंदा तुरीचे उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. सरकार म्हणते की, उत्पादन गेल्यावर्षीच्या पातळीवर राहील. पण शेतकरी आणि उद्योजकांच्या मते उत्पादनात मोठी घट आहे. प्रत्यक्ष उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहू शकते . दुसरे म्हणजे आयात जास्त वाढणार नाही. जागतिक पातळीवर देखील तुरीचे उत्पादन हे कमी आहे, त्यामुळे भारताला दहा लाख टना पेक्षा जास्त आयात करता येणार नाही . तिसरे महत्त्वाचे म्हणजे मागील हंगामातील तुरीचा शिल्लक स्टॉक हा देखील कमी आहे. कारण देशात तुरीची टंचाई मागील काही महिन्यापासून आहे. त्यामुळे नव्या हंगामामध्ये तुरीचा मागील स्टॉक हा कमी असणार आहे. कारण देशात तुरीची टंचाई मागील काही महिन्यांपासून आहे. त्यामुळे नव्या हंगामात तुरीचा मागील स्टाॅक नगण्य असेल.या तीन महत्वाच्या कारणांमुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर तुरीच्या भावात तेजी येऊ शकते शेतकरी यंदा तुरीसाठी दहा हजाराची टार्गेट ठेवू शकतात असे अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.












