कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे. राज्यातील 116 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन उभारण्यात येईल . या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे.
राज्यात तीनशे सहा बाजार समित्या व 623 उप बाजार समित्या आहेत. या सर्वांमध्ये कृषी मालाची खरेदी व विक्रीचे वर्षाकाठी सुमारे 60000 कोटींचे व्यवहार होतात. काही बाजार समितीमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने रात्री कृषिमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारा उपलब्ध होत नाही. त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे.
शेतकरी भावनाचे मॉडेलही निश्चित करण्यात आलेले असून यात तळ मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह ,तीन दुकाने पहिल्या मजल्यावर चार खोल्या,एकूण २० खोल्याची ही इमारत असेल. शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित असला तरी त्यापैकी 50% खर्च हा बाजार समितीला करावा लागणार आहे.
दुरुस्तीलाही परवानगी.
सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या शेतकरी भवनाची दुरुस्ती या निधीतून करता येणार आहे . ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवन जुनी किंवा जीर्ण झाले आहे त्यांनी पणन मंडळाच्या समितीतील वास्तुविशारदांकडून शेतकरी भवनाची प्रत्यक्ष पाहणी करून घ्यावी. ते दुरुस्ती योग्य नसल्याचे प्रमाणित झाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांना या योजनेतून नवीन शेतकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव पाठविता येईल.
असा मिळणार निधी..
नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समितीच्या उत्पन्नाच्या वर्गवारीनुसार अ आणि ब वर्गातील बाजार समित्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येईल, तर क आणि ड वर्गातील बाजार समित्यांना 70 टक्के अनुदान देण्यात येणार आहे . राज्यात अ (४३), ब (२३), क (१८), ड (३२) वर्गात बाजार समित्यांचा समावेश आहे.












