मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय..

गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.  दरम्यान यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  सहकारी संस्थांना दुधासाठी सरकार पाच रुपये अनुदान देणार अशी घोषणा करण्यात आली होती.दरम्यान आज याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्याने गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना अनुदानासह 33 ते 34 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.  32 रुपये दर ठरल्यास 27 रुपये दूध संस्थांना दर द्यावा लागणार आहे तर 28 किंवा 29 रुपये दर ठरल्यास अनुक्रमे 33 आणि 34 रुपये दर शेतकऱ्यांना मिळणार आहे.  दरम्यान याबाबत मागच्या काही दिवसापूर्वी राज्याचे दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर अधिवेशनात घोषणा केली होती.

महाराष्ट्रात गाईच्या दूध दरातील कपातीमुळे अनेक जिल्ह्यात याबाबत मोर्चे निघाले होते. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा दुग्धविकास  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती त्यानंतर खाजगी दूध संस्थाना देण्यात  येणार का यावरही संभ्रम निर्माण झाला. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते . मात्र घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश अध्याप आला नव्हता.

दरम्यान आज मंत्रीमंडळाच्या बैठकीतून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना दिले जाते आणि सरकारने दिलेले अनुदान फक्त सहकाराला आहे.

29 रुपये देणाऱ्यांनाच अनुदान

गाय दुधासाठी प्रति लिटर किंवा 29 रुपये दर देणाऱ्या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेला अनुदानाचा लाभ मिळणार आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाव्यतिरिक्त इतर खाजगी आणि काही सहकारी संघांना दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत.

गाय दुधाला दर मिळावा यासाठी राज्यभर आंदोलने झाली.  कोल्हापूर जिल्ह्याने ही याबाबत पुढाकार घेतला . विविध पक्ष संघटनांनी रस्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले हे अनुदान देत असताना प्रत्येक दूध संघाकडून उत्पादकांना किमान 29 रुपये दर देणे बंधनकारक केले आहे. 

Leave a Reply