Cultivation of melons : शेतीमध्ये खरबूज लागवड तंत्रामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे, कसे ते जाणून घ्या सविस्तर …

खरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान केली जाते. लागवड गादी वाफ्यावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. ८०-१०० दिवसात पीक काढणीस तयार होते. या खरबूज पिकाची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या-

आजच्या काळात देशातील शेतकरी कमी वेळेत शेतीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. कारण या आधुनिक काळात शेतात अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, याच क्रमाने, आज आम्ही शेतकऱ्यांसाठी खरबूज लागवड तंत्राची माहिती घेऊन आलो आहोत,  उष्ण आणि कोरड्या भागात खरबूजाची मागणी खूप जास्त असते.

जमीन रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते . जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. हे पीक जास्त पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत  घेऊ नये. भारी जमिनीमध्ये पिकांना जर कमी पाणी दिले किंवा नियमित पाणी दिले नाही, तर फळे तडकतात. या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान गरजेचे असते . त्यामुळे या पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात.  वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४-२६ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे.

खरबूजाच्या सुधारित जाती

सुधारित जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पंजाब सुनहरी,पुसा सरबती, हरामधू, व दुर्गापुरा मधू या जातीची शिफारस केली आहे.
एकरी ३५०-४०० ग्रॅम बियाणे लागते.

रोपवाटिका व्यवस्थापन

⚫ पूर्वी खरबूजाची थेट बियाणे टोकून लागवड केली जात होती. आता मात्र नवीन पद्धतीनुसार प्लॅस्टिक ट्रेमध्ये (प्रोट्रे) वाढविलेल्या रोपांची पुनलागवड केली जाते. त्यामुळे वेलांचे योग्य प्रमाण राखणे , मजूर लावणे , पाणी अशा इतर काही गोष्टीना होणारा खर्च वाचतो. आणि वेळेचीही बचत होते.

⚫ रोपे तयार करण्यासाठी साधारणतः ९८ कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपीट भरुन बियाणे लागवड केली जाते.

⚫ १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्‍टरी लागते. लागवडीनंतर पाणी द्यावे.

⚫ लागवड केल्यानंतर ८-१० ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे उबदारपणा टिकून राहतो. यामुळे बी लवकर उगवते.

⚫ रोपे उगवल्यानंतर ३-४ दिवसांनंतर पेपर काढावा व ट्रे खाली उतरवून ठेवावेत.

⚫ पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्‍साईडची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. हि क्रिया केल्यामुळे रोपे सडणार नाहीत .

⚫ नागअळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इमिडॅक्‍लोप्रीड ०.५ मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर किटकनाशकाला लेबलक्लेम आहे.)

⚫ १४ ते १६ दिवसांत (पहिल्या फुटवा फुटल्यानंतर) रोपांची पुनर्लागवड करावी.

⚫ लागवड १.५ x १ मीटर अंतरावर किंवा १.५ x ०५ मीटर अंतरावर करावी.

⚫ खरबूज लागवडीचा हंगाम – पावसाळा – जून ते ऑक्‍टोबर,उन्हाळा – जानेवारी ते मार्च,

लागवडीचे तंत्र : 

⚫ १५ सेमी उंच व ७५ सेमी रुंद असे लागवडीसाठी गादी वाफे तयार करावेत.

⚫ प्रति हेक्‍टरी लागवडी अगोदर ५०ः५०ः५० किलो नत्र,स्फुरद , पालाश व लागवड केल्यानंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्‍टर मात्रा द्यावी.

⚫ बेसल डोसमध्ये एकरी ५ टन शेणखत + ५० किलो डीएपी +५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + ५० किलो १०ः२६ः२६ + २०० किलो निंबोळी पेंड + १० किलो झिंक सल्फेट मिसळावे.

⚫ दोन गादी वाफ्याच्या मधोमध लॅटरल येते. याचे अंतर ७ फूट असावे.

⚫ ७५ सेमी इतका वाफ्याच्या वरचा माथा असावा. वाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून त्यावर ४ फुट रुंदीचा मल्चिंग पेपर अथंरुन दोन्ही बाजूंनी पेपरवर माती टाकावी . त्यामुळे वाऱ्यामुळे पेपर फाटणार नाही.

⚫ मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर दोन इंच पाईपच्या तुकड्याच्या मदतीने १० सेमी अंतरावर ड्रिपरच्या दोन्ही बाजूंना छिद्रे पाडावीत.

⚫ १.५ फूट अंतर ड्रीप लाईनच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील ठेवावे.

⚫ छिद्रे पाडून झाल्या नंतर गादीवाफा ओलवून वाफसा आल्यानंतर लागवड करावी.

⚫ रोपे लावताना व्यवस्थित दाबून लावावे , पेपरला रोप चिकटणार नाही याची काळजी घेऊन लावावे. रोपांची जेणेकरून मर होणार नाही. अशा प्रकारे एकरी सुमारे ७२५० रोपे लागतात.

⚫ प्रति हेक्‍टरी लागवडी अगोदर ५०ः५०ः५० किलो नत्र,स्फुरद , पालाश व लागवड केल्यानंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्‍टर मात्रा द्यावी.

खरबूज लागवडीतून तीन महिन्यांत मोठी कमाई

 खरबूजाची लागवड केल्यास तसेच सुधारित जातीच्या खरबूजाची लागवड शेतात केल्यास शेतकऱ्याला
दोन महिन्यांनंतरच चांगला नफा मिळू शकेल. प्रत्यक्षात शेतात खरबूज पेरल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांनीच त्याची फळे बाजारात विक्रीसाठी तयार होतात. अशा प्रकारे प्रगत खरबूज लागवड करून शेतकरी अवघ्या तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *