![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/पुणे-जिल्ह्यातील-धरणांमधून-उजनीमध्ये-दहा-टीएमसी-पाणी-तत्काळ-सोडण्यात-यावे.-अन्यथा-.webp)
शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी आपली घरे, आस्था असलेले मंदिरे , सोन्यासारख्या जमिनीवर पाणी सोडले आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे उल्लंघन केले आहे.
काल इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणातील अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणी नुसार उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबविण्यात यावे, व दहा टीएमसी पाणी उजनीमध्ये पुणे जिल्ह्यातील धरणां तुन लवकरात लवकर सोडण्यात यावे. सध्या उजनी धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतकाच असा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असमाधान निर्माण झाले आहे. . या असंतोषातून गुरुवारी (ता. १) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले .
या आंदोलनात उजनी धरणग्रस्त बजाव समितीचे अरविंद जगताप, प्रा. रामदास झोळ, महारुद्र पाटील, राजेंद्र धांडे, अमोल भिसे, संजय जगताप, नंदकुमार भोसले, शहाजी जाधव, सतीश वाघ, नानासाहेब बंडगर, शिवाजी बंडगर, पराग जाधव, सविता राजेभोसले, शहाजीराव देशमुख, सुभाष गुळवे,सचिन बोगावत, उदय राजेभोसले तसेच या आंदोलनात चार तालुक्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडल अधिकारी दीपक कोकरे ,नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, उजनी धरण कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता नितीन खाडे, आदींना या वेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. श्री. मोरे यांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
या वेळी अशोक गायकवाड, विष्णू देवकाते, देविदास साळुंखे, शरद चितारे, अशोक शिंदे, आबासाहेब बंडगर, अंकुश पाडुळे, सखाराम खोत, दादासाहेब थोरात, सुहास साळुंखे, नीलेश देवकर, किरण गोफणे तसेच धरणग्रस्त बचाव समितीच्या प्रमुखांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या.
विजयकुमार गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पाडुळे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक संदेश बावकर, सूर्यकांत कोकणे, नंदकुमार केकान, रूपेश कदम , विक्रम साळुंखे, , रतिलाल चौधर, नाना वीर आदींसह मोठा पोलिस फौजफाटा शेतकरी आंदोलनाची तीव्रता विचारात घेऊन उपस्थित होता .
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या :
– उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी तत्काळ बंद करावे.
– पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनी धरणात दोन वेळा दहा-दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे.
– ठोक जलशुल्क आदेश रद्द करण्यात यावा .
– सोलापूर शहरासाठी करण्यात येणारे समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
– इंदापूर, करमाळा, दौंड व कर्जत तालुक्यातील कालवा सल्लागार समितीसाठी प्रतिनिधी निवडावेत.