![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/हंगामानुसार-भाजीपाला-उत्पादनावर-भर-.webp)
अप्पासाहेब बलभीम कोरके यांची गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे सव्वाचार एकर शेती आहे. त्या शेतीत ते ज्वारी एक एकर ,कांदा दोन एकर आणि एक एकरावर आलटून-पालटून भाजीपाला पिकांची लागवड करतात . त्यांच्या गावापासून फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने भाजीपाला उत्पादनावर त्यांनी भर दिला आहे.
दरवर्षी ते एक एकर क्षेत्र राखीव ठेवतात त्यात हंगामानुसार कोथिंबीर, शेपू, पालक, चुका, तांदुळसा, चाकवत, मेथी, अंबाडी इत्यादी भाज्यांची लागवड करतात .अप्पासाहेब बलभीम कोरके यांनी प्रत्येकी किमान ५ गुंठ्यांचे प्लॉट तयार करून भाजीपाला उत्पादन घेतात.
भाजीपाला लागवड नियोजन:
वर्षभर भाजीपाला पिकांना चांगली मागणी असते. त्यातही फेब्रुवारी ते मे ,जून ते ऑगस्ट, त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उठाव आणि दर चांगला मिळतो. महिनाभर आधीच दराचा अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन केले जाते.बाजारात भाजीपाल्याची आवक मार्च ते मे महिन्यादरम्यान कमी असते. त्यामुळे चांगला उठाव मिळून दरही चांगला मिळत असल्याने हा हंगाम महत्त्वाचा मानला जातो .
व्यवस्थापनातील बाबी :
भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची मशागत केली जाते व ट्रॅक्टरच्या मदतीने सारे पाडून घेतले जातात. त्यानंतर दहा फूट अंतराचे वाफे तयार केले जातात.पावसाळ्यामध्ये वाफ्यांची लांबी साधारण ५० फूट ठेवावी . तर उन्हाळ्यात वाफ्यांची लांबी १० फुटांपर्यंत ठेवली जाते. उन्हाळी हंगामात बियाणे वाफ्यामध्ये आडव्या रेषा ओढून टोकण पद्धतीने लावले जाते.आणि पावसाळ्यात वाफ्यांमध्ये बियाणे हाताने विस्कटून टाकले जातात . लागवडीनंतर पाणी द्यावे . पाणी दिल्यानंतर दर ८ दिवसांनी वाफसा पाहून सिंचन केले जाते.कीड-रोगांचा प्रादुर्भाव व वातावरण बदल यांचा अंदाज घेऊन रासायनिक फवारणी घेतली जाते. तीन आठवड्यामध्ये मेथी काढणीला येते , तर पाच आठवड्यात कोथिंबीर, शेपू काढणीला येते तर चुका, चाकवत , अंबाडी आणि पालक लागवड असेल चार आठवड्यांत काढणीला येते.
पुढील दहा दिवसांचे नियोजन..
सध्या १० दिवसापूर्वी तांदुळसा, अंबाडी, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड केली आहे. एक-दोन पाणी दिल्यानंतर पुढील आठ-दहा दिवसांत साधारण पंधरा दिवसात मेथी काढणीला येईल. त्यानंतर, अंबाडी , शेपू, कोंथिबीर, तांदुळसा येईल. सध्या फक्त ते सिंचनावर भर दिला जात आहे. .