Planting wildflowers : या रानफुलामुळे वाढणार शेतकऱ्यांचे उत्पन्न, कमी खर्चात जास्त नफा, जाणून घ्या शेतीची पद्धत

आज आम्ही शेतकऱ्यांसाठी जंगली फुलांच्या लागवडीची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे शेतकरी कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतात. ती म्हणजे जंगली झेंडूची लागवड.

देश विदेशातील बाजारपेठेत देखील जंगली झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. जंगली झेंडूच्या पानांपासून आणि फुलांपासून सुगंधित तेल तयार केले जाते. जंगली झेंडूची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. फुलांचा वापर अत्तर बनवण्यासाठी असेच अनेक प्रकारची कीटकनाशके बनवण्यासाठी केला जातो. जंगली झेंडूची शेती अगदी सहज पणे आपण करू शकतात. डोंगराळ आणि सपाट भागात जंगली झेंडूची लागवड आपण व्यवसायिक पद्धीतीने करू शकता . जंगली झेंडूची लागवड विषयी संपूर्ण माहिती घेऊया-

जंगली झेंडू लागवडीसाठी माती..

जंगली झेंडूची लागवड शेतकऱ्याने चिकणमाती असलेल्या जमिनीत करावी. मातीचे Ph मूल्य 4.5-7.5 दरम्यान असावे. याशिवाय जमिनीत सेंद्रिय पदार्थही मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्याने शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.

जंगली झेंडू लागवडीसाठी पेरणी आणि सिंचन पद्धत..

झेंडूची पेरणीची पद्धत : जंगली झेंडूची पेरणी सप्टेंबर – ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान करावी. त्याचवेळी, डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी रोपवाटिकेद्वारे बियाणे पेरले पाहिजे, ज्याची योग्य वेळ मार्च ते एप्रिल आहे.

सिंचन पद्धत: जंगली झेंडूच्या लागवडीच्या सिंचनाविषयी माहिती घ्याचे झाले तर सपाट भागात त्याच्या लागवडीला ३-४ वेळा सिंचनाची आवश्यकता असते आणि डोंगराळ भागात, झेंडूच्या लागवडीसाठी पावसावर आधारित सिंचन असते.

जंगली झेंडू लागवडीसाठी खताची मात्रा : 

वन्य झेंडूच्या लागवडी अगोदर शेतकऱ्याने प्रति हेक्टरी १०-१२ क्विंटल कुजलेले शेणखत टाकावे. याशिवाय शेतकऱ्याने 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश, 100 किलो नत्र, प्रति हेक्टरी शेतात द्यावे. ज्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. तसेच, पहिल्या खुरपणीच्या वेळी म्हणजेच ३०-४० दिवसांनी दोन समान भागांमध्ये नत्र शेतात टाकावे.

जंगली झेंडू पिकावर खर्च आणि कमाई : 

जंगली झेंडूची लागवडीला शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सुमारे 3,500 रुपये खर्च येतो , शेतकऱ्याला हे पीक बाजारात विकून प्रति हेक्टरी सुमारे 75,000 रुपयांचा शेतकऱ्याला
नफा मिळू शकतो. जागेनुसार किंमत व कमाईमध्ये थोडा फरक असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *