![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/राज्यात-काही-ठिकाणी-पावसाचा-अंदाज-तर-काही-ठिकाणी-ढगाळ-वातावरणाची-शक्यता-वाचा-सविस्तर-.webp)
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक ठिकाणी गारठा कमी झाला आहे . तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार..
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली जळगांव, नाशिक, , कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात 11 फेब्रुवारी (शनिवार व रविवार) ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही जिल्ह्याना रिमझिम पावसाची शक्यता आहे असे माणिकराव खुळे यांचा अंदाज .
मराठवाडा :
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात 10 आणि 11 फेब्रुवारीला (शुक्रवार ते रविवार) पावसाची शक्यता आहे.
विदर्भात देखील पावसाची शक्यता:
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारीला विशेषतः 10 ते 11 फेब्रुवारी ह्या दिवशी पावसाची शक्यता जास्त जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबई व कोकणात पावसाची शक्यता नाही :
मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्या मध्ये पावसाची शक्यता नसेल . आकाश निरभ्रच राहण्याची शक्यता आहे. सध्या जसे वातावरण आहे तसेच तिथे राहणार आहे. अशी माहिती माणिकराव खुळ यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाची जास्त शक्यता असलेली जिल्हे ..
नागपूर ,भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा ,यवतमाळ, अमरावतीचा पूर्वोत्तरभाग..