सध्या लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत . कारण लसणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे . यंदा लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. परंतु , दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे. लसून 500 ते 600 रुपये प्रतिकिलो या दराने देशातील अनेक बाजारपेठेत विकाला जातोय. तसेच , फक्त भारतातच लसणाच्या किमती वाढल्या नाही तर चीन, तुर्कस्तानसह इतर देशांत लसणाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
लसणाची आवक सध्या बाजारपेठेत कमी असल्यामुळे लसणाच्या दरात अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत लसणाचे दर कमी होतील अशी माहितीही काही व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाशी एपीएमसीमध्ये लसणाचे दर हे 600 रुपयांच्या आसपास आहेत.लसणाच्या दरात देशातील बहुतांश भागात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात लसूण इतक्या रुपयांवर..
राज्यांमधून लसणाची आवक होत नसल्याने लसूण दरात वाढ झाली आहे.लसणाचे दर 10 मार्चपर्यंत बाजारात कमी होण्याची शक्यता आहे.सध्या अनेक ठिकाणी 400 ते 500 रुपये किलो दराने लसूण बाजारात विकला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये 600 रुपये किलोपर्यंत लसणाची विक्री होत आहे. यावर्षी लसूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे किमतीत वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लसणाचे भाव वाढले आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाजारात लसणाची आवक वाढेल, त्यामुळे भाव पडतील,असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा-बटाट्याचे दर कमी , लसणाचे दर मात्र जास्त..
दरम्यान,देशामध्ये एकीकडे कांदा-बटाटा यांसारख्या इतर भाज्यांचे दर कमी झाले आहे, कोलकाता ते अहमदाबाद य ठिकाणी एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत आहे. देशात अवघ्या 15 दिवसात लसणाच्या दरात वाढ झालेली आहे. मागील काही दिवसामध्ये 200 रुपये किलोने विकला जाणारा लसूण 300 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत आला आहे. आठवडाभराअगोदर 300 रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांवर गेला आहे.