
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजनेसाठी ७५०२१ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत १ कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल (आरटीएस) बसवण्यात येणार आहेत ,तसेच कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे.
पंतप्रधानांनी पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजना १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजनेअंतर्गत अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या ४० टक्के केंद्रीय आर्थिक सहाय्य २ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी दिले जाणार आहे. तसेच खर्चाच्या ६० टक्के केंद्रीय आर्थिक सहाय्य २ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून सध्याच्या किमतीनुसार ३०,००० अनुदान हे १ किलोवॅटच्या प्रणालीसाठी तसेच ६०,००० रुपयांचे अनुदान हे २ किलोवॅटच्या प्रणालीसाठी आणि त्याहून जास्त क्षमतेच्या प्रणालीसाठी ७८,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून सौर पॅनल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना स्वतःची नोंदणी करावी लागेल व अनुदानासाठी अर्ज करता येईल व सौर पॅनल छतावर बसवण्या करता विक्रेत्याची निवड करता येईल.
या योजनेच्या माध्यमातून वीजबिलामध्ये बचत होण्यास मदत होईल तसेच अतिरिक्त विजेची विक्री देखील वितरण कंपन्यांना करता येईल व त्यातून उत्पन्न कमवता येईल. ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीच्या माध्यमातून एका कुटुंबाला दर महिन्याला सरासरी ३०० युनिट्स विजेची निर्मिती करता येते . या योजनेच्या माध्यमातून दळणवळण, पुरवठा साखळी,स्थापना, संचालन आणि देखभाल,विक्री, व इतर क्षेत्रात मिळून सुमारे सतरा लाख थेट रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.