
शेतकऱ्यांचा कल आले लागवड करण्याकडे वाढलेला असून गेल्या दोन वर्षापासून आले पिकांचे दर समाधानकारक आहे. बियाणे खरेदी मार्चमध्ये सुरू होत असून शेतकऱ्यांकडून बियाण्याच्या निरोगी प्लॉटचा शोध आले लागवड करण्यासाठी सुरू आहे. तज्ज्ञ यांनी गतवर्षीच्या तुलनेत बियाण्यांचा दर जास्त म्हणजे 31 ते 40 हजार रुपये पर्यंत जाईल असे व्यक्त केले होते . पाण्याच्या स्थितीवर लागवडीचे चित्र एकूणच स्पष्ट होणार आहे.
सातारा हा राज्यात आले पीक घेणारा प्रमुख जिल्हा असून आले पिकाची लागवड ही सरासरी तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावर होते. यावर्षीच्या हंगामात सरासरी क्षेत्रात इतकी लागवड होण्याचा अंदाज असून पाण्याच्या तिथे अनुसार क्षेत्र निश्चित होणार आहे. सध्या निरोगी व दर्जेदार असणाऱ्या बियांचा शोध सुरू करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॉटची निरीक्षणे अनेक प्रगतिशील शेतकरी करतात. मोठ्या प्रमाणात बियाण्यांची देवाण-घेवाण ही सातारा व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून होते. जुलै ऑगस्टमध्ये आल्याच्या प्लॉटला या दोन जिल्ह्यातील शेतकरी भेट देण्याकरता जातात. बियाणे हे ग्रोधा, बंगलोर मधूने घेतले जातात . बियाणे खरेदीस वेग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून येणार आहे. शेतकऱ्यांचा हालचाली त्यादृष्टीने सुरू आहेत.
शेतकऱ्यांना दर हा आल्यास प्रतिगाडीस(५०० किलो)३५ ते ३६ हजार रुपये मिळत आहे. तज्ज्ञ शेतकऱ्याकडून बियाण्यांचा दर ३८ ते ४० हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा दर जास्त आहे. प्रतिगाडीस गतवर्षी हा दर सरासरी २५ ते ३० हजार रुपये तर अगदी अंतिम टप्प्यात ३५ हजार रुपयांपर्यंत गेला होता.
कसा होतो कंदकुजीचा प्रादुर्भाव
आले पिकास गत हंगामात अपुरा पावसाचा फटका बसला. कंदकुजी क्षेत्रात वाढ ही कमी पावसामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना कंदकुज हे आटोक्यात न आल्याने आले काढून टाकावे लागले. बियाणे खरेदी करताना निरोगी फ्लॅट संख्या देखील कमी असल्याने शेतकऱ्याकडून पाहणी करूनच बियाणे खरेदी होणार आहे.
आले हंगाम दृष्टीक्षेपात
– भांडवली खर्चात गतवर्षी बियाणे जास्त दराने खरेदी केल्याने वाढ
– हुमणी प्रादुर्भावात कमी पर्जन्यमानाने वाढ
– शेतकऱ्यांना आले कंदकुजीमुळे मध्यावर काढावे लागले
– पिकास वर्षभर गाडीला तीस हजारावर दर
– ३८ ते ४० हजार रुपयांवर बियाण्याचे दर जाण्याची शक्यता