महाशिवरात्रीसाठी रताळ्याची आवक वाढली,इतक्या रुपयांचा मिळत आहे दर ? वाचा सविस्तर …

रताळ्यांची आवक महाशिवरात्रीनिमित्त तरकारी विभागात सुरू झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. राज्यातील गावरान रताळ्यांना घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 35 ते 38 रुपये दर मिळत आहे तर करमाळा भागातून आलेल्या रताळ्यांना दर्जानुसार 14 ते 18 रुपये भाव मिळत आहे तर 40 ते 70 रुपये किलोला किरकोळ बाजारात भाव मिळत असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी माहिती दिली .

गावरान रताळ्याची मागील वर्षी 1000 पोती आवक कराड मलकापूर भागातून झाली होती . आता यामध्ये वाढ होऊन यंदा दोन ते तीन हजार पोती आवक झाली आहे आवक झाली असली तरीही गावरान रताळ्यांना मागणी जास्त आहे त्यामुळे घाऊक बाजारात मागील वर्षापेक्षा रताळ्यांना भाव जास्त मिळाला आहे.

गावरानची आवक कमी होत आहे.

गावरान रताळी आकारांनी लहान, दिसायला आकर्षक आणि चवीला गोड असतात. त्यामुळे या रताळ्यांना ग्राहकांकडून जास्त मागणी असते . मात्र यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत गावरान रताळ्यांच्या आवक वाढली आहे तर मागील काही वर्षांचा विचार केल्या तर गावरान रताळ्यांची आवक दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे . बीड जिल्ह्यातून पूर्वी आवक व्हायची मात्र मुंबईला येथील बाजारापेक्षा जास्त भाव मिळतो . त्यामुळे तिथून आणि कराड भागातून निर्यात होण्याचे प्रमाण वाढले आहे

करमाळ्यात नवीन प्रजात विकसित..

करमाळा भागातून येथील बाजारात मोठ्या प्रमाणात गावरान रताळ्यांच्या आवक व्हायची . परंतु इथे नवीन जात यंदा विकसित केली गेली आहे. बेळगाव रताळ्यांच्या धर्तीवर ही जात विकसित करण्यात आली आहे . त्यामुळे उत्पन्न वाढले आहे बाजारात त्या भागातून तपल चार ते पाच हजार पोती आवक झाली आहे. परंतु त्या रताळ्यांना गावरान सारखी चव नसते ते रताळे रंगाने पांढरे असून त्याला बारीक साल आहे. त्याला घाऊक बाजारात किलोला 14 ते 18 रुपये दर मिळत आहे. दरम्यान स्थानिक भागातच चांगला भाव मिळत असल्याने यंदा कर्नाटक मधून रताळ्याची आवक झाली नाही .

Leave a Reply