राज्यामध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) येत्या या खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा साठा ४५ लाख ५३ हजार टन मंजूर करण्यात आला आहे. त्यात डीएपी ५ लाख टन, युरिया १३ लाख ७३ हजार टन, संयुक्त खते (एनपीके) १८ लाख टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) ७ लाख ५० हजार टन पोटॅश (एमओपी) १ लाख ३० हजार टन, या खतांचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे . नॅनो डीएपीच्या १० लाख आणि नॅनो युरियाच्या २० लाख बॉटल्स मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
केंद्र शासनाने विभागीय खत परिषद नुकतीच यंदा खरीप हंगामासाठी आयोजित केली होती.राज्याला त्यामध्ये खतसाठा मंजूर करण्यात आला. महिनानिहाय खतसाठा मंजूर करण्यासाठी खरीप हंगाम २०२४ साठी मागील तीन खरीप हंगामांतील खत विक्री विचारात घेण्यात आलेली आहे.२०२१ ते २०२३ मधील जिल्हानिहाय खत वापर जिल्हानिहाय खतसाठा मंजूर करताना विचारात घेण्यात आलेला आहे.
यंदा जिल्हानिहाय खतसाठा या तीन हंगामांतील राज्याचा एकूण मंजूर खतसाठा तसेच सरासरी व कमाल खत वापर याचे गुणोत्तर लक्षात घेऊन मंजूर केला आहे . एनपीके (नत्र, स्फुरद, पालाश) आदर्श गुणोत्तर ४ ः २ ः १ राहील याची खतांचा वापर करताना काळजी घ्यावी.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,व सर्व जिल्हा परिषदांचे कृषी विकास अधिकारी व कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणवत्ता निरीक्षक विकास पाटील यांनी अशा सूचना दिल्या आहेत.
खरीप हंगाम २०२४ महिनानिहाय मंजूर खतसाठा (टनांमध्ये)
महिना…युरिया…डीएपी…पोटॅश…संयुक्त खते…सुपर फॉस्फेट…एकूण
एप्रिल…१०९८४०…२५०००…११७००…९००००..४५०००…२८१५४०
मे…१७८४९०…७००००…२०८००…२२५००…११२५००…६०६७९०
जून…३१५७९०…१५००००…२९९००…५०४०००…१९१२००…११९०९४०
जुलै…३२९५२०…१०००००…२६०००…४१४०००…१६५०००…१०३४५२०
ऑगस्ट…२७४६००…९००००…२३४००…३४२०००…१३५०००…८६५०००
सप्टेंबर…१६४७६०…६५०००…१८२००…२२५०००…१०१२५०…५७४२१०
खरीप हंगाम २०२४ जिल्हानिहाय मंजूर खतसाठा (टनांमध्ये)
जिल्हा…युरिया…डीएपी…पोटॅश…संयुक्त खते…सुपर फॉस्फेट..एकूण
जालना…५९०००…२५९००…४३००…८४५००…३५८००…२०९५००
परभणी…३६२००…२५४००…३१००…५६७००…१६०००…१३७४००
हिंगोली…१६२००…१५८००…३३००…३४०००…१६१००…८५४००
छत्रपती संभाजी नगर…१०००००…२५२००…५३००…१७३००.
..४०९००…२८८७००
नांदेड…५३९००…३३३००…८०००…७९८००…२५६००…२००६००
लातूर…२४२००…२४२००…२३००…५३८००…१८८००…१२३३००
बीड…५१०००…२१६००…३०००…९७४००…१४१००…१८७१००
अमरावती…३०१००…२५२००…२७००…४४६००…३५८००…१३८४००
धाराशिव…२०९००…१८४००…१६००…३५५००…९४००…८५८००
अकोला…१८७००…१८०००…३९००…३२४००…२०३००…८८७००
बुलडाणा…२८९००…२२८००…३१००…८२७००…४०४००…१७७९००
वाशीम…७७००…१३२००…७००…३४९००…१५८००…७२३००
नागपूर…४५८००…२४३००…१५००…५१४००…३७६००…१६०६००
वर्धा…२८४००…१४१००…२९००…३५४००…२९१००…१०९९००
भंडारा…२३९००…५४००…२००…३५०००…२१५००…८६०००
यवतमाळ…५५४००…२६५००…४८००…१०५१००…३७०००…२२८८००
चंद्रपूर…४३४००…१३९००…१२००…५५१००…४२७००…१५६३००
गडचिरोली…१८४००…३१००…७००…२३९००…८६००…५४७००
गोंदिया…२०१००…२९००…२००…३२५००…१६९००…७२६००
रायगड…११५००…२४००…६००…१८००…७००…१७०००
रत्नागिरी…७६००…६००…३००…४६००…९००…१४०००
सिंधुदुर्ग…५९००…५००…३००…४७००…१३००…१२७००
नाशिक…७६९००…१८३००…२५००…९६४००…२६५००…२२०६००
नगर…७५४००…१८०००…३९००…९८०००…३६९००…२३२२००
जळगाव…१०१४००…१५५००…२४०००…११२२००…७०२००…३२३३००
धुळे…४७४००…५२००…३४००…३४७००…१५१००…१०५८००
नंदुरबार…४१७००…६२००…५०००…२४७००…१९७००…९७३००
पुणे…८९५००…१४०००…६१००…८१०००…२१५००…२१२१००
कोल्हापूर…४९८००…१३९००…९०००…६२८००…१३५००…१४९०००
सांगली…४२८००…११६००…९२००…५५६००…२०३००…१३९५००
सातारा…३७७००…१००००…४१००…४६०००…११७००…१०९५००
सोलापूर…८२४००…२६५००…१०७००…८१२००…२८९००…२२९७००
ठाणे…७९००…२००…१००…१७००…१००…१००००
पालघर…१२९००…४००…१००…२६००…३००…१६३००
राज्यात नॅनो डीएपीच्या १० लाख नॅनो व युरियाच्या २० लाख बॉटल्स करण्यात आल्या आहेत.
जिल्हानिहाय नॅनो युरिया मंजूरसाठा (बॉटलमध्ये)
जिल्हा…नॅनो युरिया…डीएपी
हिंगोली…१७६००…२०००
छत्रपती संभाजी नगर…५५०००…४७८००
जालना…३६३००…३००००
परभणी…५५८००…३५८००
नांदेड…१३४७००…६४७००
लातूर…५१६००…३७२००
धाराशिव…३७०००…२८३००
वाशीम…१८५००…५०००
अमरावती…२४४००…८००००
अकोला…५६४००…३१७००
बीड…१२५७००…५९८००
बुलडाणा…२७०००…६३०००
वर्धा…१२६१००…७१५००
यवतमाळ…२११६००…४८३००
नागपूर…८६७००…७५०००
गोंदिया…१७५००…१८००
नंदुरबार…३८२००…२३६००
चंद्रपूर…६२९००…२०९००
गडचिरोली…२१८००…१५००
भंडारा…१११००…४२००
नाशिक…७२४००…५८६००
नगर…१०९८०…३७०००
जळगाव…७३२००…३३१००
धुळे….७१०००…५९२००
रत्नागिरी…१५७००…०००
पुणे…६१३००…९१००
कोल्हापूर…४४३००…१०२००
सांगली…८७३००…१७०००
सातारा…५६७००…२८५००
सोलापूर…१२६५००…१४२००
ठाणे…८८००…३००
पालघर…२११००…४००
रायगड…३१००…३००
सिंधदुर्ग…३२९००…०००












