आज आणि उद्या राज्यामध्ये उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागामध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने खानदेशातील धुळे, सोलापूर ,नंदूरबार आणि नाशिक,जळगावसह तसेच मराठवाड्यातील धाराशिव,लातूर, या जिल्ह्यातील काही भागामध्ये हवामान विभागाने विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
तर ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने यावेळी वारे वाहणार आहेत असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, सांगली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
पावसाची तीव्रता रविवारी राज्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता असून . रविवारी कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तसेच खानदेशामधील जळगाव ,धुळे, नंदूरबार जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर पुणे, मराठवड्यातील जालना,छत्रपती संभाजीनगर,
हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव ,लातूर, आणि विदर्भातील गडचिरोली , यवतमाळ व चंद्रपूर, या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.












