इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर या गावातील प्रगतशील नंदकुमार रणवरे यांनी त्यांच्या एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यात काकडी पिकाचे उत्पादन घेतले . जानेवारीच्या सुरुवातीस, उन्हाळी काकडी लागवड तर खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून किंवा जुलैमध्ये केली जाते.
काकडीचे पीक खरीप हंगामामध्ये आणि प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये घेतले जाते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते व गर थंड असतो . त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडीला चांगली मागणी असते. परिणामी किंमतही चांगली असते .
१८ जानेवारीला नंदकुमार रणवरे यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रात हिरवी काकडी लावली व अर्धा एकर क्षेत्रात पांढरी काकडी लावली होती . काकडीचा पहिला तोडा २८ फेब्रुवारी रोजी ४१ व्या दिवशी म्हणजेच करण्यात आला आहे. ४० दिवसांमध्ये काकडी पिकाचे साधारण २० तोडे होतात.
सध्या एका तोड्यामध्ये साधारण ५०० ते ६०० किलो काकडी निघते व ही काकडी बारामती व पुणे मार्केटला जात असून सर्वसाधारणपणे प्रतिकिलोला १६ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याचे रणवरे यांनी माहिती दिली . काकडी पिकावरील रोगनियंत्रण व पाण्याचे योग्य नियोजन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.काकडी पीक कमी कालावधीत जास्त फायदा मिळवून देणारे पीक आहे.
काकडी पिकाचे प्राधान्याने संरक्षण करणे आवश्यक आहे , तसेच उन्हाळ्यामध्ये भुरी, करपा, दावण्या या रोगांपासून, तर लाल भुंगे व कीडमाशी या कीटकांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना काकडीवर या रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
अशी केली लागवड..
-चांगली नांगरट जमिनीची करून घ्यावी . त्यानंतर जमीन तापू द्यावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.
-प्रति हेक्टर जमिनीमध्ये २५ ते ३० टन शेणखत हे कुळवाच्या शेवटच्या पाळी आगोदर चांगले मिसळून द्यावे.
– लागवडीसाठी सरीच्या मध्यभागी दोन वेलीतील अंतर ४५ ते ६० सें.मी ठेवावे . ३ ते ४ ठेवून बिया प्रत्येक ठिकाणी टोकाव्यात. बियांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे.
-लागवडीनंतर २५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन जोमदार रोपे ठेवावीत. सरासरी प्रतिहेक्टर २ ते २.५ किलो बियाणे लागवडीसाठी
वापरावे.












