भारतात महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य, महिलांचा कृषी पर्यटन उद्योगात वाढता सहभाग…

ग्रामीण भागातील महिलांचा कृषी पर्यटन उद्योगामध्ये कल हळूहळू वाढत आहे. भारतामध्ये महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे हा पहिला जिल्हा ठरला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे पुणे विभागातून तब्बल ७६ महिला कृषी पर्यटक व्यावसायिकांची नोंद झाली आहे. त्यामुळे कृषी पर्यटक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळणार आहेत .

गेल्या काही वर्षांपासून कृषी पर्यटनाकडे उत्पन्नाचा नवा स्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. विशेषतःनागपूर, सातारा , पुणे, ठाणे, कोकण, या भागांमध्ये कृषी पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये कृषी पर्यटन केंद्रे संकटात आली होती.

कोरोनाचे संकट गेल्यानंतर या पर्यटनामध्ये स्वच्छते वर भर , वृक्षारोपणावर भर, महिलांचा सहभाग, सोशल मीडियाद्वारे ,जनजागृतीसारखे अनेक बदल केले . त्यामुळे आता हा व्यवसाय उभारी घेऊ लागला आहे आता महिलादेखील कृषी पर्यटन व्यवसायाकडे वळू लागल्या आहेत.

सध्याच्या धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये निवांतपणा गरजेचा झाला आहे. आता लोकांचा आठवड्याची सुट्टी शहरापासून लांब निवांत ठिकाणी घालविण्यावर विशेष भर दिला जातो .त्यामुळे ग्रामीण भागातील पर्यटनास यातूनच अधिक महत्त्व मिळाले आहे .

आता शहरी लोक चैन म्हणून नाही तर गरज म्हणून आता पर्यटन करत आहेत .यातूनच राज्यात कृषी पर्यटन ही संकल्पना सुरु झाली आहे . शहरी लोकांना असे पर्यटन करणे पसंत पडू लागले आहे .

महिलांना रोजगाराच्या अनेक संधी…

महिलांना देखील रोजगाराच्या अनेक संधी कृषी पर्यटन उद्योगामुळे निर्माण झाल्या आहेत. यामध्ये पर्यटन केंद्रातील झाडांची देखभाल करणे,स्वच्छतापूर्ण स्वयंपाक बनविणे (पुरणपोळी, मासवडी इ.), परिसराची साफसफाई करणे, पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताची तयारी व स्वागत करणे,
झाडू व टोपल्या बनविणे,गोधडी शिवणे व विक्री करणे, हस्तकलेच्या वस्तूंची विक्री करणे.पापड, कुरडया, टोमॅटो सॉस, फळांचे पल्प,मसाले, चटण्या, ठेचा ताज्या स्वच्छ भाज्या पॅकिंग करून विक्री करणे, कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग चालविणे, लोणची, धान्य, डाळी साफ करून विक्री करणे. , शेणाच्या गोवऱ्या बनविणे, इ याच संकल्पनेवर कृषी पर्यटन उद्योग आधारित आहे.

ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना कृषी पर्यटन उद्योगातील या उपक्रमाद्वारेमोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आपल्याच गावामध्ये काम करण्याची संधी ग्रामीण कृषी पर्यटनात मिळते . त्याचबरोबर महिलांचे आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होईल, असे मोरगाव येथील निसर्ग संगीत कृषी पर्यटनाच्या अध्यक्षा संगीता भापकर यांनी सांगितले.

राज्यातील कृषी पर्यटनाचे सहा विभाग असे :

कोकण विभाग : रायगड, मुंबई, ठाणे ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
नाशिक विभाग : नगर, धुळे,नाशिक, जळगाव, नंदुरबार.
पुणे विभाग : सातारा, सांगली,पुणे, सोलापूर, कोल्हापूर.
नागपूर विभाग : नागपूर, वर्धा, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
अमरावती विभाग : अमरावती, वाशीम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ.

दोन एकरांवर कृषी पर्यटन केंद्र मी २०२१ मध्ये सुरू केले. सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत तीन वर्षांमध्ये ५०० हून अधिक ग्रुपमधील सुमारे पाच ते दहा हजार पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.
शीतल धुमाळ -देशमुख, महिला कृषी पर्यटक, इंगवली, ता. भोर

Leave a Reply