देशात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कडधान्यांचे उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. असे असताना सध्या देशातील बाजारपेठेत मक्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील काही बाजारपेठांमध्ये आवक वाढली आहे. पहिल्या अंदाजात केंद्र सरकारने यंदाच्या खरीपात २.३१ दशलक्ष टन मका उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.
असे असताना मात्र, संततधार पाऊस, कीड-रोग आणि पावसाअभावी अनेक भागात खरीप मका पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपात उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे. तर रब्बीमध्ये ३.१९ टक्के अधिक पेरणी होत आहे.
रब्बीची पेरणी २२६ लाख हेक्टरवर पोहोचली. यामुळे रब्बीमध्ये मक्याचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु, कडाक्याची थंडी, बदलते हवामान आणि वाढत्या किमान तापमानाचा रब्बी पिकांवरही परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला चांगली मागणी आहे. दरही स्थिर आहेत. त्यामुळे देशातून मक्याची निर्यातही सुरळीत सुरू आहे. सध्या देशाच्या बाजारपेठेत मका सरासरी 2 हजार ते 2 हजार 200 रुपये दराने विकला जात आहे.
रब्बीतील मक्याची आवक येत्या काळात बाजारपेठेवर दबाव आणू शकते. रब्बीमध्ये मक्याची आवक होईपर्यंत सध्याचा भाव २०० रुपयांपर्यंत राहील, असा अंदाज मका बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
Source: krishijagran