सोमवारी pm किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. मोदी सरकारने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी 17 वा हफ्त्याबाबत पहिला निर्णय घेतला . दोन हजार रुपयांचा 17 वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा शपथ घेतली . तसेच सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. मोदी सरकारने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला.
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा पहिला निर्णय..
शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर हा पहिला निर्णय घेतला आहे. त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. या हफ्त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत.असे यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले .
असा चेक करा तुमचा हप्ता..
पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 16 हप्ता यापूर्वी 28 फेब्रुवारी या दिवशी आला होता.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत केवायसी पूर्ण करून घ्यावी तसेच बँक खाती आधार संलग्न करून घ्यावीत . https://pmkisan.gov.in या वेबसाइड वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जमा झाला की नाही हे शेतकरी पाहू शकतात.