लाडकी बहिण योजनेच्या आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ,काय आहे हि योजना जाणून घ्या सविस्तर …

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यासंबंधीचा शासन निर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलिंडर मोफत महिलांना मिळणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय ३० जुलै रोजी जारी केला आहे. या योजनेचा लाभ या योजनेचा लाभ लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांनाही मिळणार आहे आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना मिळणार आहे . ३ गॅस सिलेंडर वार्षिक या योजनेच्या माध्यमातून मोफत मिळणार आहेत.

काय आहेत अटी?
1. या योजनेचा लाभ महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे .

2. एका कुटुंबामध्ये फक्त एकच लाभार्थी योजनेमध्ये पात्र असेल.

3. एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर मिळणार नाहीत.

4. या योजनेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेले कुटुंब पात्र असतील.

सदर लाभ केवळ १४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस लाभर्त्यांना मिळणार आहे .

5. या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत पात्र असलेल्या ५२.१६ लाख लाभार्थ्यांना पात्र धरण्यामध्ये येईल.

शासन निर्णय
केंद्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत . या योजनेला मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने संबोधले जाईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *