प्रशिक्षण व मानक विकास संस्था (सारथी), बीड छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रायोजित शेतकरी व युवक युवतींना परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन पायलटचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
७ दिवसीय व १८० दिवसीय, अशा दोन कालावधीत सदरील प्रशिक्षण आहे. २० सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारले जातील. राज्यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील शेतकरी, युवक-युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानक विकास संस्था (सारथी) पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार सारथी संस्थेच्या खर्चाने ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा परभणी येथील कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण व प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रीकल्चर प्रशिक्षण व महात्मा फुले राहुरी येथील कृषी विद्यापीठ या ठिकाणी ड्रोन पायलट प्रशिक्षण दिले जाणार आहे .
त्यानुसार २० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६:१५ वाजेपर्यंत शेतकरी, युवक-युवती यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.२३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर सारथी संस्थेस सर्व कागदपत्रे पाठवावी लागणार आहेत.
त्यामुळे युवक-युवतींनी वेळेवर अर्ज जमा करावीत . या संबंधित सर्व माहिती किंवा इतर सूचनाही लिंकवरच दिल्या आहेत शेतकरी, युवकांनी sarthi.mkcl.org/#/login या लिंकवर जाऊन नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ड्रोनचे महत्त्व कृषी क्षेत्रामध्ये वाढू लागले आहे. पिकावर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. तसेच पुढील काळात ड्रोनचा वापर विविध कामासाठी करण्यात येणार आहे . त्यामुळे भविष्यात नक्कीच युवकांना ड्रोनचे प्रशिक्षण अधिक लाभदायक ठरणार आहे.
लाभार्थी पात्रता ?
महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या प्रवर्गातील लाभार्थी अर्जदार असावा. त्यांचे ८ लाखांवर वार्षिक उत्पन्न नसावे, ७ दिवसीय प्रशिक्षणाकरिता अर्जदार किमान १२ वी पास असावा. १८० दिवसीय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रीकल्चर प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी पास असावा. या अगोदर सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेतलेला नसावा.
७ दिवसीय व १८० दिवसीय प्रशिक्षण..
परभणी व राहुरी विद्यापीठात ७ व १८० दिवस निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. प्रशिक्षणार्थीचे शुल्क प्रशिक्षणार्थीच्या वतीने सारथी संस्थेद्वारे देण्यात येणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकतील.
तर अपात्र व्हाल..
• अपूर्ण कागदपत्रे असणे, ऑनलाइन अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरणे ,विहित मुदतीत अर्ज सादर न करणे,
• हमीपत्रातील नियमांचे उल्लंघन केल्यास ,तसेच आर्थिक सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा सारथी संचालकांना असेल.
• Sarthi-maharashtragov.in या लिंकवर विहित नमुन्यातील अर्ज हा उपलब्ध आहे.
• वेळेवर लाभार्थ्यांनी अर्ज भरुन पाठविले नाहीत तर अर्ज बाद ठरणार आहेत.