शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, पीएम-आशा योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर,काय आहे हि योजना जाणून घ्या सविस्तर …

शेतकऱ्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पीएम-आशा या योजनेसाठी मोदी सरकारने 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली . त्यामध्ये शेतकऱ्यासाठी देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला .पीएम-आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे असे सरकारने जाहीर केले . कडधान्ये आणि तेलबिया पिकांची किमान आधारभूत किंमत या निर्णयामुळे  ठरेल.या प्रकारच्या पिकांमध्ये भारत आत्मनिर्भर होणार आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

पीएम-आशा हि योजना काय आहे ?

पीएम-आशा ही एकात्मिक योजना आहे. केंद्र सरकारने शेतकरी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजना व किंमत समर्थन योजना पीएम-आशा योजनेमध्ये विलीन केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यास मदत होईलच, या शिवाय ग्राहकांचीही सोय होईल .लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत

कॅबिनेट बैठकीतील इतर निर्णय .

आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मीडिया आणि मनोरंजन जगतातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले . अॅनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स ,व्हीज्युअल इफेक्ट्स, आणि एक्सटेंडेड रियालिटीसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यास मंजूरी दिली आहे . क्रिएटर्सच्या इको-सिस्टमला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.तसेच रोजगारांच्या नव्या संधी मिळणार आहेत. ‘बायो-राइड’ योजनेला केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली . जैवतंत्रज्ञानात या निर्णयाने भारताची प्रगती होणार आहे. यामुळे सातत्याने विकास,क्षमतेत वाढ करण्यावर , आर्थिक पोषण यावर जोर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *