देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ ..

देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी (ता. १९) ‘श्‍वेतक्रांती २.०’चा गुरुवारी प्रारंभ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला आहे . या व्दारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे तसेच एक व्यापक उपक्रम रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविला जाणार आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांत हा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या तीन उपक्रमांपैकी एक आहे.दुग्धव्यवसाय निर्यातीला प्रोत्साहन देणे ,दुग्धोत्पादन वाढवणे, दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करणे , महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.

अनेक महिला डेअरी क्षेत्रामध्ये गुंतलेल्या आहेत, त्यापैकी ६०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय एकट्या गुजरातमध्ये महिला करत आहेत. हा नवीन उपक्रम कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला आणि महिलांच्या सक्षमीकरणला अधिक बळकट करण्यावर भर देईल, असे आयोजित कार्यक्रमामध्ये अमित शाह यांनी संबोधित  केले. 

तसेच, डेअरी सहकारी संस्थांमध्ये मायक्रो-एटीएम बसवणे व देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपे किसान क्रेडिट कार्ड दिले जातील असे हि यावेळी अमित शहा यांनी सांगितले . या शिवाय ६७,९३० प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (पीएसीएस) संगणकीकरणासाठी कामे करण्याची आदर्श पद्धती (SOP ) त्यांनी जारी केली.

‘एनडीडीबी’ करणार पतपुरवठा..

दरम्यान,दुग्ध सहकारी संस्थांकडून पुढील ५ वर्षांमध्ये दूध खरेदी ५० टक्क्यांनी वाढवण्याचे सरकारचे श्वेतक्रांती २.५ अंतर्गत उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये बहुउद्देशीय ‘पीएसीएस’ची स्थापना आणि बळकटीकरण , बहुउद्देशीय जिल्हा सहकारी संस्था आणि १ लाख नवीन आणि विद्यमान जिल्हा सहकारी संस्था, यामध्ये समाविष्ट आहे, सुरुवातीला राष्ट्रीय दुग्ध विकास विभाग (एनडीडीबी) स्वतःच्या संसाधनांमधून या उपक्रमाला पतपुरवठा करणार आहे.

Leave a Reply