कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. या अनुदानासाठी पात्र असलेल्या ९६ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. परंतु २१ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही.
प्रत्येक गावात ज्या शेतकऱ्यांची ई- केवायसी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केली आहे . ई-केवायसी केली तरच अनुदान मिळणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी . असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदान मंजूर झाले आहे. या अर्थसाहाय्यासाठी ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० अनुदान देण्यात येणार आहे तसेच ०.२ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य मिळणार आहे..
ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आधार संलग्न करणे आवश्यक आहे. शासनाकडून बँक खात्यावर ही रक्कम आधार संलग्न केल्यानंतरच डीबीटीच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार लिंक केले आहे .
कशी करावी ई-केवायसी..
शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे ,ई-केवायसी करणे ज्या शेतकऱ्यांचे बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी E-KYC करून घ्यावी . कृषी सहाय्यक त्यांच्या लॅागइनमधून उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल नंबर वर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून E-KYC करू शकतात. तसेच स्वतः सुद्धा शेतकरी या पोर्टल वर जाऊन ई – केवायसी OTP च्या मदतीने किंवा Biometric च्या साह्याने किंवा सेवा सुविधा केंद्रात (CSC)जावून सुद्धा E-KYC करु शकतात.
ई-केवायसी करण्यासाठी..
🔰 https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जावे.
🔰 या पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement Status या ऑपशन click करावे.
🔰 शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर टाकावा.
त्यानंतर मोबाईलवर आलेल्या OTP माध्यमातून किंवा (CSC) सेवा सुविधा केंद्रातील बायोमेट्रिक मशिनच्या मदतीने ई-केवायसी करू शकता.
🔰 गावात प्रदर्शित करण्यात आलेली यादीत ज्यांचे नाव आहे त्या शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पुर्ण करावी. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा.