Ration Card | आता शेतकऱ्यांचा रेशन कार्डवरील शिधा होणार बंद! खात्यात मिळणार ‘इतके’ रुपये, जाणून घ्या कोणाला?

ration card

Ration Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असणारे रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. या रेशन कार्डावरून आपण आपल्या ओळखीचा पुरावा दाखवू होऊ शकतो. तसेच रेशन कार्डचा ( Ration Card) वापर फक्त कागदपत्रांसाठीच केला जात नाही, तर यावर सरकारकडून स्वस्थ अन्नधान्य पुरवठा देखील केला जातो. आता रेशन कार्ड (Ration Card) धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शेतकऱ्यांचा शिधा होणार बंद
सामान्यांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील रेशन कार्डवर स्वस्त अन्नधान्य मिळते. परंतु आता काही शेतकऱ्यांना रेशन कार्डवरील शिधा मिळणार मिळणे बंद होणार आहे. त्याचबरोबर कर्जबाजारी (loan) शेतकरी किंवा दुष्काळीत भागात राहणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. खरं तर, मराठवाडा विदर्भातील शेतकरी जास्त आत्महत्या करतात. आता याच शेतकऱ्यांचा रेशन कार्डावरील मिळणारा शिधा बंद करण्यात येणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शिधा होणार बंद?
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यांमधील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना (Agriculture) राष्ट्रीय अन्नसुरक्षा नियमाखाली अल्पदरात गहू, तांदूळ शिधा देण्यात येतो. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशन कार्डवरील शिधा बंद करण्यात येणार आहे.

धान्याऐवजी मिळणार पैसे
आता आत्महत्याग्रस्त विदर्भातील या 14 जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या शेतकऱ्यांचा शिधा बंद करण्यात येणार असून, त्यांना त्या ऐवजी पैसे देण्यात येणार आहेत. तर या शेतकऱ्यांना धान्याऐवजी 150 रुपयांची रक्कम खात्यात जमा करण्यात येणार आहे.

source:mieshetkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *