राज्य सरकारने अखेर तुकाराम मुंढे यांचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले , मुंढेंच्या प्रस्तावात नेमके काय आहे ? जाणून घ्या सविस्तर …

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले होते . त्यामध्ये कुठलाही बदल न करता गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

वारंवार मुंढे यांच्या बदल्या केल्या जातात व त्यावर चर्चा देखील होत असते.परंतु कमी वेळ असतानाही पशुसंवर्धन विभागामध्ये त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासात आमूलाग्र बदल सुचविणारे धोरण तयार केले. विभागाची केवळ पुनर्रचनाच न करता पशुपालकांची समृद्धी कशी होईल, उत्पादक,यावर फोकस करत हे धोरण त्यांनी बनविले आहे.

मंत्रिमंडळाने स्वीकारलेल्या मुंढेंच्या प्रस्तावात नेमके काय आहे?

■ प्रशासन प्रभावी बनण्यासाठी दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन विकास विभागाची पुनर्रचना करून दोन्ही विभाग एकत्र करणार.
■ दुग्धव्यवसाय , पशुसंवर्धन, व मत्स्यव्यवसाय विभाग विभागाचे नाव असे असेल.
■ पशु व पशुजन्य उत्पादकतेमध्ये वाढ होईल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये मोलाची भर पडेल.
■ पशू उद्योजकता ही संकल्पना पशुपालनाऐवजी विकसित करणार.
■ विभागामध्ये १५,५५२ इतकी पदे असतील. ७,२५६ पदे नव्याने भरती करणार .
■ तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयांची निर्मिती ३५१ तालुक्यांमध्ये,
■ पशुवैद्यकीय चिकित्सालय ३१७ तालुक्यांमध्ये सुरू केले जातील.
■ पशुसंवर्धन, दुग्धविकासाशी संबंधित सर्व विषय एका छताखाली (उत्पादन ते विक्री) आणाणार.
■ काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेली कौशल्यपदे निर्माण करणार. कालबाह्य झालेली बरीच पदे रद्द करणार,
■ तालुका पातळीपर्यंत पशुंवरील उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार. दूध उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाययोजना करणार , दूध उत्पादनामध्ये जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *