महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले होते . महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला घोषित होतील. याबद्दलची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिताही लागू झाली आहे.

26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत मुदत झारखंड विधानसभेची आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार?

एकाच दिवशी संपूर्ण राज्यात मतदान पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांकडून मिळाली आहे . 22 ऑक्टोबरपासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख सुरु होईल. उमेदवार आपला अर्ज 29 ऑक्टोबरपर्यंत जमा करु शकणार आहेत. यानंतर सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी 30 ऑक्टोबरला होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

2019 च्या विधानसभेला कोणाचे किती जागांवर वर्चस्व?

विधानसभेच्या महाराष्ट्रात एकूण 288 जागा आहेत. भाजप आणि शिवसेना मागील विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण या वर्षी हे चित्र पूर्ण बदलेले आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ठरला होता. तर 56 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019 पक्षीय बलाबल काय?

भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13 एकूण – 288

दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु होणार..

26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत मुदत झारखंड विधानसभेची आहे. सणासुदीच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जात नाहीत. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *