लाडक्या बहिणींना मिळणार आता दिवाळीचे गिफ्ट , काय आहेत योजनेच्या “अटी” जाणून घ्या सविस्तर …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्य सरकारने सुरु केल्यापासून दर महिन्याला १५०० रुपये पात्र महिलांना दिले जात आहे. या योजनेचे पैसे जवळपास २ कोटी महिलांच्या खात्यात जमा झाल्याचे शासनाने कळविले आहे. आतापर्यंत महिलांना पाच महिन्यांच्या हप्त्यांची रक्कम मिळाली आहे.

७५०० रुपये लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे मिळाले आहेत.आता परत एकदा दिवाळीपूर्वी महिलांसाठी एक खुशखबर देण्यात आली आहे. सरकारकडून महिलांना दिवाळीसाठी मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे . आता महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिला जाईल,तसेच अतिरिक्त २५०० रुपये काही निवडक महिलांना दिले जाणार आहेत. असे सरकारने सांगितले आहे. या योजनेमध्ये काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही देण्यात येणार आहे . त्यामुळे यावर्षीची महिलांची दिवाळी गोड होणार आहे.

लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सर्व पात्र महिलांना सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्त योजनेचे ३००० रुपयांचे बोनस देण्यात येणार आहे.

दर महिन्याला मिळणाऱ्या पैशांच्या व्यतिरिक्त हा दिवाळी बोनस असणार आहे. तसेच २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही काही निवडक महिलांना दिली जाईल. याप्रकारे एकूण ५५०० ( ३०००+ २५००) रुपयांचा लाभ काही महिलांना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच फक्त दिवाळीचा बोनस मिळणार आहे.

पण दिवाळी बोनस कोणाला मिळणार ?

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या योजनेचा उद्देश आहे. दरमहा १५०० रुपयांची रक्कम लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दिली जाते”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” एक महत्त्वाकांशी योजना आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित केले जातात .

महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आहेत

◼️ महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत.
◼️ 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असले पाहिजे. हे नियम पाळणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे.
◼️वय २१ ते ६० वर्षांमध्ये असले पाहिजे.

‘या’ अटी पूर्ण कराव्या लागतील?
◼️लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत महिलेचे नाव असले पाहिजे.
◼️ कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ त्यांनी योजनेच्या माध्यमातून घेतला पाहिजे.
◼️ त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेला हवे .
◼️ सर्व नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
◼️ ३००० रुपयांचा बोनस या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना मिळेल.
◼️पात्र महिल्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *