केंद्रीय कॅबिनेटची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकऱ्यांसाठी या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह ६ पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. ८७,६५७ कोटी रुपये सरकार यासाठी खर्च करणार आहे. रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गहू , मोहरी, जवस ,हरभरा, मसूर, आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे . ८० कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे,याचा फायदा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रामध्ये गहू उत्पादक आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा मोठा लाभ होईल.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती सांगितली , गहू, मोहरी, हरभरा यांच्या आधारभूत किंमतीत अनुक्रमे ३०० रुपये, १५० रुपये, आणि २१० रुपये वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तसेच आगामी रब्बी हंगामामध्ये शेतपिकांच्या उत्पन्नाला आधार देण्याच्या उद्देशाने पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पेरणीच्याआधी २२ पिकांसाठी एमएसपीची शिफारस कृषी मूल्य आणि किंमत आयोगाकडून केली जाते. यामध्ये ७ रब्बी व १४ खरीप पिके पिकांचा समावेश असतो. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यावर शिक्कामोर्तब केला जातो .
🔰 जवसाच्या किंमतीमध्ये १३० रुपयांची वाढ करून आता एक हजार ९८० रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे .
🔰 मोहरीच्या किंमतीत – ३०० रुपयांची वाढ, आता ५ हजार ९५० रूपये क्विंटल हमीभाव असणार.
🔰गहू – १५० रुपयाची वाढ करत आता दोन हजार ४७५ रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे .
🔰करडईच्या किंमतीत १४० रुपयाची वाढ होऊन आता ५ हजार ९४० रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
🔰मसूराच्या किंमतीमध्ये २७५ रुपयांची वाढ करून आता सहा हजार सातशे रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
🔰हरभऱ्या किंमतीत – २१० रुपयाची वाढ होऊन ५ हजार ६५० रूपये क्विंटल हमीभाव असणार.