सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात इतक्या रुपयांची वाढ ..

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा कमाल दर ५ हजारांपर्यंत दिवाळी अगोदर होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांमध्ये आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे.

मंगळवारी कमाल दर ७ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. शिवाय सरासरी दरातमध्ये देखील दुपटीने वाढ झाली आहे. आता सोलापूर बाजार समितीत जुन्या कांद्याबरोबर नवीन कांद्याची आवक वाढली आहे.

दिवाळीला ३ दिवस सुट्टी असल्याने तब्बल ७६१ ट्रक कांद्याची आवक २९ ऑक्टोबर रोजी झाली . तेव्हा सरासरी दरात मोठी घसरण झाली होती. प्रतिक्विंटल १६०० रुपये सरासरी दर मिळाला होता .

आता दिवाळी सुट्टीनंतर आवक वाढण्याची शक्यता होती; परंतु दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी माल विकण्यास आणलेला नाही. त्यामुळे ३१३ ट्रक कांद्याची आवक सोमवारी झाली.

कमाल दर सहा हजार २२५ रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच सरासरी दरातही दुपटीने म्हणजे १५०० रुपयांवरून ३००० रुपयांवर पोहोचला होता. ३०८ ट्रक कांद्याची आवक मंगळवारी झाली .

मंगळवारी कमाल दर ७१०० रुपये मिळाला. सोमवारच्या तुलनेत पुन्हा दरात वाढ झाली.तर सरासरी दर ३१०० रुपये होता. अचानक आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे म्हटले जात आहे.

आता आवक आणखी वाढणार

सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा आता विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे पुढील ४ महिने मोठी आवक राहणार आहे. सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक दररोज राहण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यामुळे बाजार समितीकडून नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कच्चा माल विक्रीला आणू नये, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *