हापूस आंबा बागायतदारांसाठी खुशखबर, जीआय मानांकन नोंदणी करा हे होतील फायदे ..

कोकण हापूस नावाने इतर आंब्यांची होणारी विक्री थांबवण्यासाठी , कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) दिले आहे .

बागायतदारांकडून ‘हापूस’च्या नावावर होणाऱ्या विक्रीला विरोध होत असला तरी मानांकन नोंदणीबाबत आणखीन ही निराशाच आहे. अद्याप सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील फक्त १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी केली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, येथील हापूसला २ वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला जात आहे.

देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही. परंतु , त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे.

जीआय टॅग लावून बागायतदारांना ही नोंदणी केल्यानंतर आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.

६५ हजार हेक्टर क्षेत्रावर रत्नागिरी जिल्ह्यात आंबा लागवड असून, जिल्ह्यात २० हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१,२५० हेक्टर क्षेत्र असून, ३४,४५० बागायतदार आहेत. परंतु , जीआय नोंदणीसाठी कमी प्रतिसाद लाभत आहे.

उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ,कोकण हापूस आंबा उत्पादक , हे जीआय मानांकन नोंदणीसाठी बागायतदारांकडे पाठपुरावा करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात नऊशे बागायतदार, १४० प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सातशे ९९ बागायतदारांनी नोंदणी केली आहे. उर्वरित बागायतदारांनीही पुढे यावे, असे आवाहन संस्थांकडून सातत्याने केले जात आहे.

बारकोडमुळे कळू शकेल उत्पादकाचे नाव..

◼️ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील केवळ १,८३९ बागायतदारांनी अधिकृत नोंदणी.
◼️ जीआय मानांकन देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यालामिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक
हापूस आंबा विकता येणार नाही.
◼️ बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक .
◼️ नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवणे शक्य होणार आहे .
◼️मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मिळणार आहे.

☑️ आवश्यक कागदपत्रे

◼️ ‘जीआय’ मानांकनासाठी
◼️ आधारकार्ड,
◼️ निवडणूक ओळखपत्र,
◼️सातबारा
◼️ याशिवाय २६०० शुल्क भरावे लागते.
आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, नोंदणीनंतरच नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किवा फळासोबत बारकोड वापरता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *