राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली.
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी १२ लाख महिलांनी अर्ज केले. त्यापैकी १ कोटी ६ लाख महिलांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याचे दीड हजार या प्रमाणे साडेसात हजार रुपये आले आहेत.
आता पुन्हा महायुती बहुसंख्य मतांनी निवडूण आल्याने लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये (आश्वासन दिल्याप्रमाणे) डिसेंबर महिन्यात येतात का याची महिलांना प्रतिक्षा आहे. मात्र सध्या तरी डिसेंबरमध्ये या योजनेचा वाढीव हप्ता येण्याची शक्यता नाही.
याचे कारण म्हणजे नवीन सरकार आता आपला अर्थसंकल्प सादर करेन आणि त्यानंतरच नव्या योजनेसाठी आर्थिक तरतूद होईल. त्यामुळे जाणकारांच्या म्हणण्यानुसार नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ पासून महिलांच्या खात्यावर लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये येऊ शकतात. तोपर्यंत तरी सरकार अस्तित्वात आल्यावर १५०० रुपयेच महिन्याला मिळतील. याचाच अर्थ डिसेंबरमध्ये कदाचित १५०० रुपये इतकीच रक्कम लाडक्या बहिणींना मिळू शकेल.