Red Onion Price : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली, लासलगावला कसा मिळाला बाजारभाव?

Red Onion Price : आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला (Lal Kanda) कमीत कमी १४०० रुपये, तर सरासरी ४१०० रुपये बाजारभाव मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी २ हजार रुपये, तर सरासरी ४१०० रु. बाजारभाव मिळाला.

लासलगाव बाजारात सुमारे साडेनऊ हजार क्विंटल, तर विंचूर बाजारात आज सुमारे ४ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ही आवक सकाळच्या सत्रातील आहे.

पोळ आणि उ्न्हाळी कांदा खात आहेत भाव..

दरम्यान पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत लेट खरिपाचा पोळ कांदा विक्रीस येत असून आज या बाजारात पोळ कांद्याची साडेपाच हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ४१५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर याच बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची आवक अजून टिकून आहे. उ्न्हाळी कांद्याला ५९०० रु. सरासरी बाजारभाव मिळाला. आज सकाळच्या सत्रात नाशिक जिल्ह्यातील कांद्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कळवण बाजारात १२५० क्विंटल उन्हाळी कांदा आवक होऊन सरासरी ६५०० रुपये इतका भाव मिळाला.

राज्यात पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ४७५० रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजारात सरासरी ३७५० रुपये प्रति क्विंटल, तर मुंबई बाजारात ३२५० रुपये बाजारभाव होता.

लाल कांदा वाढला:
मागील आठवड्याच्या तुलनेत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वधारली आहे. काल नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची सुमारे ५९ हजार क्विंटल आवक झाली, तर नगर जिल्ह्यात काल दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सुमारे १७ हजार क्विंटल आवक झाली.

यंदा हवामानाच्या फटक्यामुळे लाल कांद्द्याची आवक उशिरा सुरू झाली असून डिसेंबर महिन्यात ही आवक वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *