Keli and Papaya Bajarbhav : सध्या पपई आणि केळीला काय बाजारभाव मिळतोय?

Keli and Papaya Bajarbhav: सध्या पपईची बाजारातील आवक रोडावली असली, तरी मुंबई फळ बाजारात चांगली आवक झाली आहे. काल दिनांक ३ डिसेंबर २४ रोजी मुंबई फळ बाजारात पपईची १८७० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी पपईला कमीत कमी बाजारभाव १००० रुपये, तर सरासरी बाजारभाव १७५० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

पुणे बाजारात पपईला १२०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला, तर नाशिक बाजारात पपईला कमीत कमी ९०० रुपये आणि सरासरी १२०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. थोडक्यात प्रतवारीनुसार पपईला ५ ते १५ रुपये प्रति किलो इतका सरासरी दर मिळताना दिसत आहे.

दरम्यान काल दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मुंबई फळबाजारात केळीची १०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३ हजार रुपये, तर सरासरी ३५०० रुपये बाजारभाव मिळाला. नाशिक बाजारात भुसावळी केळीला सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव, तर नागपूरला सरासरी ५२५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

*पपईचे सरासरी बाजारभाव (दिनांक ३ डिसेंबर, सरासरी प्रति क्विंटल)*
अहमदनगर —1150

नाशिक —1200

जळगाव — 2000

छत्रपती संभाजीनगर- 1300

मुंबई –1750

भुसावळ — 2000

कल्याण–2500

सोलापूर— 500

अमरावती- 2250

पुणे– 1200


*केळी बाजारभाव (दिनांक ३ डिसेंबर/ सरासरी दर)*
मुंबई – 3500

नाशिक-1500

नागपूर- 525

पुणे-1100

पुणे-मोशी-3500

Leave a Reply